सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, नेमकं कारण काय?
Sindhudurg BJP : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला युती न केल्यामुळे मोठा फटका सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात मिळाला. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये असा फटका महायुतीला बसू नये यासाठी खासदार आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकतीच महायुतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसोबत तसेच पदाधिकाऱ्यांसोबत कणकवलीत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यानमहायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गमध्ये भाजपमध्ये (Sindhudurg BJP) बंडाचे निशाण फडकू लागले आहे. 43 प्रमुख अधिकारीni सामूहिकरित्या राजीनामे दिल्याची माहिती असून या अंतर्गत नाराजीने भाजपसमोर आता मोठा पेच बांधकाम झाला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीची घोषणा खासदार नारायण राणे यांनी केली. हि घोषणा केल्यानंतर काही तास उलटत नाहीत तोच भाजपमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळालंहे. ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपला राजीनामा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सोपवला. या निर्णयापाठोपाठ ओरोस मंडळातील इतर 42 प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे देऊन पक्षाला मोठा धक्का दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदय कुमार जांभवडेकर, युवा मोर्चाचे जयेश चिंचळकर आणि अनुसूचित जाती मोर्चाचे सुनील जाधव यांसारख्या महत्त्वाच्या एकूण 43 पदाधिकाऱ्यांनी, ज्यात बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्रप्रमुखांचाही समावेश आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक?
राज्यात रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग, सोलापूरकोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगरपरभणी आणि धाराशिव या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आज 16 जानेवारीपासून सुरू होऊन 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल, तर 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.