VIDEO: “मी माफ करेल पण…”, स्मृती मानधनाने आपल्या आयुष्यातील कठीण क्षणाविषयी केला खुलासा!

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि उपकर्णधार स्मृती मानधनाने आपल्या फलंदाजीने अनेक युवा खेळाडूंना प्रेरित केले आहे. मागील काही वर्षांपासून ती संघाची मुख्य खेळाडू बनली आहे. क्रिकेटच्या वाढत्या कारकिर्दीदरम्यान मात्र तिला वैयक्तिक आयुष्यात एका मोठ्या घटनेचा सामना करावा लागला.

गेल्या वर्षीच तिचे लग्न मोडले आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठे वादळ निर्माण झाले. या घटनेबाबत तिने सार्वजनिकरित्या काहीही सांगितले नाही. स्मृतीचे लग्न पलाश मुच्छलसोबत ठरले होते. नुकतेच तिने एका पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील कठीण क्षणाबद्दल सांगितले आहे.

स्मृतीला राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्रीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा प्रश्नाचे उत्तर देण्याआधी भारतीय खेळाडूने थोडा वेळ घेतला आणि आपल्याला केवळ क्रिकेटबदद्ल बोलायचे आहे, हे स्पष्ट केले.

या पॉडकास्टमध्ये स्मृतीला शमानीने विचारले की, तुम्ही शेवटचे कधी रडला होता? यावर तिने म्हटले, “मला आठवत नाही, कारण मी खऱ्या आयुष्यात रडत नाही. मी चित्रपट पाहताना मात्र रडते. मी ‘मुसाफिर कॅफे’ पाहत होते आणि त्यातील गोष्टींनी मला खूप भावूक केले. मला इतका आनंद झाला होता की मी रडले.”

शमानीने स्मृतीला विचारले की आयुष्यातील सर्वात कठीण रात्र कोणती? यावर तिने उत्तर दिले. ती म्हणाली, “कदाचित एखादी विश्वचषकातील (सामन्याची) रात्र असेल. मी इथे फक्त क्रिकेटबद्दलच बोलेन.”

या पॉडकास्टदरम्यान स्मृतीने तिच्या व्यक्तिमत्वाविषयीही सांगितले आहे. ती म्हणाली, “माझ्याशी कुणाचंही पटत नाही, मात्र मला खूप राग येऊ शकतो. माझ्याशी पंगा घेऊ नका. जोपर्यंत मी तुमच्या मार्गात येत नाही, तोपर्यंत तुम्हीही माझ्या मार्गात येऊ नका. मी सूड घेणार नाही, मात्र जे घडले ते विसरणारही नाही.”

नुकतेच स्मृतीने तिच्या क्रिकेट कारकिर्दीत मोठा टप्पा गाठला आहे. तिने मिताली राजचा 10868 धावांचा विक्रम मोडून महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. तसेच ती सुरू असलेल्या महिला आशिया कप टी20 स्पर्धेत शतकी खेळी करणारी पहिली भारतीय ठरली.

Comments are closed.