Solapur News : भीषण अपघात! देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 5 जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर अपघाताची बातमी: सोलापूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) बातमी समोर आली आहे. सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur-Pune National Highway) भीषण अपघात झाला आहे. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 1 महिला जखमी झाल्याची माहिती आहे. सोलापूरपुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ जवळील देवडी पाटीजवळ हि अपघाताची घटना घडलीय. (Solapur Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहुन अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला घातलाय. शनिवारी रात्री 12 च्या सुमारास वाहन चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जोरदार अदाळल्याने हा अपघात झालाय. दरम्यान जखमी महिलेवर मोहोळ मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मोहोळ पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु होतं. दरम्यान, या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Solapur Accident : भीषण अपघातात  5 जणांचा जागीच मृत्यू, सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र

दरम्यान, पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेली एरटीका कार (MH-46 Z 4536) या वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला. या कारमध्ये एकूण सहा प्रवासी असून यात तीन पुरुष आणि तीन महिला होते. सर्व प्रवासी एकमेकांचे मित्र असल्याचे समजून येत आहे. अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून ज्योती जयदास टाकले, रा. सेक्टर ७, पनवेल, जि. रायगड या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. जखमी महिलेस तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Solapur Accident News : कार चालकाचा ताबा सुटला, भरधाव कर थेट झाडावर आदळली, अन्…

घटनेची माहिती मिळताच, मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस मदत पुरवून आवश्यक कार्यवाही करण्यात आली. अपघाताचा परिणाम अत्यंत भीषण असून मृतदेह पूर्णतः कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर कार रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकलेले होते.

या अपघातात ज्योती जयदास टकले वय 37 वर्षे रा. सेक्टर न 13 पनवेल या जखमी असून त्यांच्यावर मोहोळच्या शासकीय रुग्णलायत उपचार सुरु आहेत. तर माला रवी साळवे वय 40 वर्षे राहणार पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल, अर्चना तुकाराम भंडारे वय 47 वर्षे सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट, विशाल नरेंद्र भोसले वय 41 वर्षे राहणार आरबीआय एम एस ओ रूम नंबर 8 रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल, अमर पाटील रा. खारघर, आनंद माळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जखमी
1. ज्योती जयदास टकले वय 37 वर्षे रा. सेक्टर न 13 पनवेल

मयत
1) माला रवी साळवे वय 40 वर्षे राहणार पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 न्यू पनवेल
2) अर्चना तुकाराम भंडारे वय 47 वर्षे सेक्टर 7 खांदा कॉलनी पनवेल वेस्ट
3) विशाल नरेंद्र भोसले वय 41 वर्षे राहणार आरबीआय एम एस ओ रूम नंबर 8 रेल्वे कॉलनी पनवेल स्टेशन जवळ पनवेल
4) अमर पाटील ,खारघर
5) आनंद गर्ली.

हेहे वाचा

आणखी वाचा

Comments are closed.