धक्कादायक! दिवसाढवळ्या भररस्त्यात पत्नीला संपवलं, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात, बार्शी हादरलं

सोलापूर बार्शी क्राईम न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या पत्नीची चाकूने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या करून आरोपी पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. बार्शी शहराजवळील बार्शी-परंडा रोडवर आज दुपारी  ही घटना घडली आहे. या घटनेनं  बार्शी शहरात खळबळ उडाली आहे.

आरोपीला पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

दरम्यान, कौटुंबिक करणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर आरोपी ऋषिकेश पाटील याने आपल्या पत्नी धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली. वाद चिघळताच संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या धनश्री पाटील हिचा जागीच मृत्यू झाला. ऋषिकेश आणि धनश्री हे दोघेही खाजगी बँकेमध्ये काम करत होते. याप्रकरणी बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपी ऋषिकेश पोलिसांच्या ताब्यात आहे.

चारित्र्याच्या संश्यातून आरोपी ऋषिकेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती

सूत्रांच्या माहिती नुसार चारित्र्याच्या संश्यातून आरोपी ऋषिकेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.  विशेष म्हणजे ऋषिकेश आणि धनश्री यांचा काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला होता.

महत्वाच्या बातम्या:

बीड पुन्हा हादरलं! अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या तरुणाला अमानुषपणे संपवलं, नातेवाईक आक्रमक, पोलीस ठाण्यातच ठिय्या

आणखी वाचा

Comments are closed.