पाकिस्तानमधील महिला आत्मघाती दहशतवाद्यांचे पथक

जैश-ए-मोहम्मदची शाखा करतेय भरती : निशाण्यावर जम्मू-काश्मीर

न्यूज एजन्सी/श्रीनगर

पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा आता महिला आत्मघाती दहशतवाद्यांची तुकडी निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती करत आहेत. या आत्मघाती पथकाला तयार करण्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा जमात-उल-मोमिनातला देण्यात आली आहे. महिला आत्मघाती दहशतवाद्यांच्या तुकडीसाठी बैठक पार पडली आहे. 48 एप्रिल रोजी मुजफ्फराबादच्या गोजर येथील ओएसए (वन स्टेप अहेड कॉलेज) कॉलेजमध्ये 10 तासांचे विशेष सत्र आयोजित करत महिलांची भरती करण्यात आली आहे. या सत्रात दहशतवादी मसूद अझहरची बहिण सादिया अझहरसमवेत पाकव्याप्त काश्मीरमधील 4 कमांडरही उपस्थित होते. सुमारे 150 हून अधिक महिलाना या विशेष सत्रासाठी बोलाविण्यात आले होते. 18 एप्रिल रोजी झालेल्या आत्मघाती तुकड्यांची भरती आणि प्रशिक्षण तळाची पूर्ण माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून संबंधितांना सोपविण्यात आली आहे.

पाकिस्तानी सैन्याची भूमिका

पाकिस्तानचे सैन्य आता महिलांच्या आत्मघाती तुकड्यांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रीत करून आहे. याचमुळे जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा जमात-उल-मोमिनातला पुढे केले जातेय. याचबरोबर पाकिस्तानात हरकत-उल-मुजाहिदीनशी  संबंधित महिलाही दहशतवादाकरता सक्रीय आहेत. त्यांनाही जम्मू-काश्मीरमधून भारताच्या विविध हिस्स्यांमध्ये दहशतवाद फैलावण्याची जबाबदारी पाकिस्तानी सैन्याकडून देण्यात येतेय.

जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याचा धोका

जमात-उल-मोमिनातकडून महिलांची आत्मघाती तुकडी तयार करण्यासाठी दोन  टप्प्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. अखेरच्या सत्रात पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहर स्वत: यात सामील होणार असल्याचे समोर आले आहे. जमात-उल-मोमिनातच्या बैठकीत महिलांना जम्मू-काश्मीरच्या नकाशासोबत तेथील प्रत्येक जिल्हा आणि तेथील लोकसंख्या स्वरुपाबद्दल माहिती देण्यात आली. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या महिलांना या सत्रानंतर लाहोरमध्ये एक विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याचा उल्लेख बैठकीत करण्यात आला आहे.  यापूर्वी 17 जानेवारी रोजी लाहोरच्या वीमेन लॉ कॉलेज आणि बहावलपूरच्या मरकज उस्मान-ओ-अलीमध्येही महिला दहशतवाद्यांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्यात 90 हून अधिक महिलांनी भाग घेतला होता.

Comments are closed.