IPL 2026: डीसीविरुद्ध हेनरिक क्लासेनने 3 षटकार मारताच क्रिस गेल-आंद्रे रसेलच्या 'या' खास यादीत केली एंट्री

सनरायझर्स हैद्राबादचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने मंगळवारी (२१ एप्रिल) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी डावांमध्ये १०० षटकार मारणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत केवळ दोनच खेळाडू त्याच्यापुढे आहेत, क्रिस गेल आणि आंद्रे रसेल.

आयपीएल २०२६ चा ३१ सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळला गेला. यामध्येच क्लासेनने ही कामगिरी केली आहे. त्याने डीसीविरुद्ध १३ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारत नाबाद ३७ धावा केल्या. त्याच्या या तीन षटकारांमुळेच हे खास शतक झाले आहे. त्याने हा टप्पा केवळ ५२ डावांमध्येच गाठला. गेलने ३७ आयपीएल डावांमध्येच षटकारांचे शतक पूर्ण केले होते. तसेच रसेलने ४७ व्या डावांत ही कामगिरी केली आहे.

या सामन्यात डीसीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकत एसआरएचला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. अभिषेक शर्माने नाबाद १३५ धावांच्या जोरावर संघाने २० षटकात २ विकेट्स गमावत २४२ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात डीसीने २० षटकात ९ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या. त्यामुळे हा सामना डीसीने ४७ धावांनी गमावला. या सामन्याचा सामनावीर अभिषेक ठरला.

आयपीएल २०२६ ची ऑरेंज कॅप सध्या अभिषेककडे असून क्लासेन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अभिषेकने खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ५३.८३ च्या सरासरी आणि २१५.५३ च्या स्ट्राईक रेटने ३२३ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतके आणि एक शतक केले आहे.

क्लासेनने ७ सामन्यांत ५३.३३ सरासरीने आणि १५३ च्या स्ट्राईक रेटने ३२० धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० षटकार पूर्ण करणारे फलंदाज (डावांनुसार)
क्रिस गेल – ३७ डाव
आंद्रे रसेल – ४७ डाव
हेनरिक क्लासेन – 52 डॉ

Comments are closed.