गिरीश महाजन यांनी किमान अजितदादांचा तेवढा तरी आदर्श घ्यावा; अमोल मिटकरींचा सल्ला, म्हणाले….
अमोल मिटकरी: एक सर्वसामन्य महिला मंत्र्यावर चिडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 16 हजार ट्विट त्या व्हिडीओचे झाले आहेत. इथ अजित पवार (Ajit Pawar) आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. पत्रकार त्यांना विचाराचे पहाटे कामाला सुरुवात का करतात, तर दादा सांगायचे यामुळे लोकांना ट्राफिक समस्या जाणवत नाही. आपल्यामुळे त्यांना त्रास होतं नाही आणि कामे देखील लवकर होतात. मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहचता येते. गिरीश महाजन यांनी तेवढा तरी अजित पवारांचा आदर्श घ्यावा, असा सल्ला अमोल मिटकरी (अमोल मिटकरी) यांनी गिरीश महाजन यांना दिला आहे. नाशिकमधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ते बोलत होते. (मुंबई महिला संतप्त गिरीश महाजन)
मुरलीधर मोहोळ वर अमोल मिटकरी: मुरलीधर मोहोळ टाइमबाँड पाळला नाही, त्यांनी माफी मागावी
माझा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न आहे की, अजित पवार यांचे विमानात बसण्यापूर्वीचे सीसीटीव्ही अद्याप बाहेर का आले नाहीत? तुम्ही म्हणाला 15 दिवसांत ब्लॅक बॉक्स डेटा बाहेर आणू, मग 4 महिने झाले का हा डेटा बाहेर आला नाही? त्यांनी टाइमबाँड पाळला नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. अशोक खरातचे सीसीटीव्ही गतीने बाहेर येतात, परतवाडा प्रकरणातील सीसीटीव्ही बाहेर येतात, मग अजित पवार यांच्या अपघाताचे का नाहीत? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Amol Mitkari Ajit Pawar Death News: नाशिक, परतवाडा प्रकरणासारखी या प्रकरणाला गती आली तर…
बारामती विमान दुर्घटनेचा ब्लॅकबॉक्स अद्याप बारामती पोलीस ठाण्यात आहे. बारामतीत मी मागील 3 दिवस फिरत आहे. बारामतीचे लोक आम्हाला सांगत आहेत तेअजित पवार विमान दुर्घटनाप्रकरणी तपासाबाबत आमची नाराजी आहे. नाशिकपरतवाडा प्रकरणासारखी या प्रकरणाला गती आली तर नक्कीच आम्हाला बरं वाटेल. असेही अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.
Amol Mitkari: …हे दादांच दुर्दैव म्हणायचं का?
महाराष्ट्रात एफआयआर होतं नाही ह्याची खंत आहे. बेंगलोरमध्ये एफउत्पन्नआर दाखल झाला, तर सरकारने परत पाठवला, त्यांच म्हणणं आहे ते, कागदांची पुर्तात झाली नाही. हे दादांच दुर्दैव म्हणायचं का? अद्याप हे सांगत नाही साहिल मदान कुठे आहे? तो कपूर कुठे आहे? जिवंत आहेत की मेले, हे तरी आम्हाला सांगा. अशा भावनाहे अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.