भाजपचे असले कुटील डाव सर्वसामान्य जनतेला आवडणार नाही, ‘आप’ खासदारांच्या फुटीवर रोहित पवार यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आम आदमी पार्टीच्या राज्यसभेच्या खासदारांमध्ये मोठी फूट पडली आहे. आप नेते राघव चड्ढा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला असून आपचे राज्यसभेतील १० पैकी ७ खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचे असले कुटील डाव सर्वसामान्य जनतेला आवडणार नाही, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

X वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले की, “ज्या ठिकाणी आपले बस्तान बसू शकत नाही, अशा ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडायचे ही नव्या भाजपची Modus Pperandi झाली असून महाराष्ट्रातील पक्षांप्रमाणेच आप पक्षालाही फोडण्याचा प्रयत्न भाजपने केला. राघव चड्ढा आणि त्यांच्या कुटुंबियांची व्यावसायिक नाकेबंदी करून तर अशोक मित्तल यांच्याशी संबंधित व्यवसायांवर छापेमारी करून गळाला लावण्याचे काम भाजपने केले आहे.”

ते पुढे म्हणाले की, “भाजपचे असले कुटील डाव सर्वसामान्य जनतेला कदापि आवडणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून एखाद्या राजकीय पक्षाला कमकुवत करण्याचा लोकशाही विरोधी प्रयत्न होत असेल तर लोकशाही रक्षणार्थ आम्ही आम आदमी पक्षासोबत खंबीरपणे उभं राहून भाजपच्या या विघातक प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो.”

Comments are closed.