मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याचं कारण काय? काय ठरले निकष? सुनील शेळकेंनी स्पष्ट सांगितलं
पुणे: महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. खातेवाटप झालं. मात्र, अद्यापही पक्षातील काही नेत्यांची नाराजी तशीच आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावेळी काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, तर काही बड्या नेत्यांना डच्चू दिला. दरम्यान यावेळी मंत्रीमंडळ विस्तारातवेळी काही नावे चर्चेत होती मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. तर पुण्यातील मावळ मतदारसंघात मावळ पँटर्न मोडीत काढत विक्रमी मतांनी विजय मिळवलेले सुनील शेळके यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा पत्ता कट झाल्याचं कारण सांगितलं आहे.
संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नाव असणाऱ्या सुनील शेळकेंचा ऐनवेळी पत्ता कट झाला आहे. मंत्रीपद देताना नेमके कोणते निकष लावण्यात आले आणि त्या निकषात शेळके बसत नव्हते का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याचा खुलासा थेट सुनील शेळकेंनी केला आहे. पुणे जिल्ह्यात दोनच मंत्रीपद दिली जाणार होती. याची कल्पना मंत्रीपद विस्ताराच्या तीन दिवस आधीचं मला अजित दादांनी दिली होती, असा सुनील शेळकेंनी म्हटलं आहे. मात्र, मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळं मी नाराज नाही, असंही सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणालेत सुनील शेळके?
महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांचं मोठं संख्याबळ होतं. 130-132 संख्येपर्यंत भाजप पोहोचला होता. त्याखालोखाल शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर होती. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या नंबरवरती होता. आम्हाला 10 जागा जेव्हा मिळाल्या. मंत्रीमंडळ विस्तार होण्याच्या तीन दिवस आधी त्यांनी मला सांगितलं होतं, आपल्याला अकरा किंवा बारा जागा मिळतील असं अपेक्षित होतं. मात्र, आपल्याला दहा जागा मिळाल्या आहेत. राज्याचा समतोल ठेवत असतानाच पक्षाने, श्रेष्ठांना, युवकांना किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देताना थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रकोकण, विदर्भ अशा भागातील विस्तार करताना समतोल ठेवायचा प्रयत्न आम्ही करतो आहे,असं पक्षाकडून सांगण्यात आल्याचं सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.
तर पुढे बोलताना शेळके म्हणाले, पक्षाचा समतोल राखताना जो काही निर्णय होईल, तो मान्य करावा लागेल. हे सांगितल्यानंतर क्षणाचाही विचार न करता मी सांगितलं पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं मी सांगितलं असं सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.
कोणत्या निकषानुसार मंत्रीपद दिली?
कोणत्या निकषानुसार मंत्रीपद दिली या प्रश्नावर उत्तर देताना सुनील शेळके म्हणाले, पुणे जिल्ह्यात दोन मंत्रीपदे मिळाले. एक खातं अजित पवारांकडे आहे आणि दुसरं दत्तात्रय भरणे यांना दिलं आहे. आता तिसरं खातं पुण्यालाचं द्यायचं तर मग आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इतकी खाती नव्हती. यावेळी दहा मंत्रीपद आणि इच्छुकांची संख्या जास्त होती. दहामधून पुण्याला दोन अशा पध्दतीने दोन खाती आहे, मात्र, इतर जिल्ह्यांमध्ये फक्त एक एक आहेत. नाशिकला दोन आहेत, तिथे देखील तितकं संख्याबळ आहे, आधीच पुण्याला दोन पदे मिळाल्यानंतर तिसरं पद मागणं आपल्याला उचित वाटतं नाही. जो आता निर्णय झाला आहे, तो मान्य आहे. पुढच्या काळात कुठेना कुठे स्थान देतील, असं मला वरिष्ठांनी सांगितलं आहे. जो निर्णय झाला आहे, त्याचं मी स्वागत करतो, असंही यावेळी सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.
मी पक्षसंघटनेतून वाढलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे नाराजी नाही, नाराजी घेऊन काम करू नये, कोणत्याही पदापेक्षा मला माझ्या मतदारसंघातील कामे, करणं गरजेचं वाटतं आहे, मंत्रीपदापेक्षा जनतेची कामे होत आहेत, असं सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.