दादा बोलले असतील तर फायनल.. महापालिका निवडणूकांवरून सुनिल तटकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले ‘लवकरच

पुणे: राज्यात गेलं काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा पालकमंत्री पदांची पुनर्रचना करणार असल्याची चर्चा आहे .पालकमंत्री पदांची यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्यात आली होती .यावरून महायुतीत शिवसेना आणि अजित पवार गटात नाराजी असल्याचा सूर राज्यभर उमटला .दरम्यान आगामी महापालिकांची तयारी सुरू झाली असून महायुतीत अनेकजण स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत देत आहेत .यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय .दादा बोलले असतील महापालिका निवडणूक स्वबळावर लढलो तर ते फायनल ..रायगड नाशिकवर लवकर निर्णय घेतील .मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेणार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले .पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते . (Pune Politics)

दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला असून डिपॉझिटही  जप्त झालंय . यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत भाजपला जनतेने संधी दिली याबद्दल सर्व नेत्यांचे अभिनंदन करतो .पराभूत होणाऱ्या पक्षाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं . आलो आहे की ईव्हीएम वर दोष द्यायचा .आम्ही लोकसभेला पराभव स्वीकारला होता .आता ईव्हीएम वर दोष न देता पराभव स्वीकारावा असेही ते म्हणालेत .

काय म्हणाले सुनिल तटकरे?

एकीकडे निवडणुकांवरून राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अजित पवार पक्षाच्या धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे .राजीनामासाठी दबाव वाढतोय. दरम्यान सुनील तटकरे म्हणाले ,मी अनेकदा स्पष्ट केला आहे की देशमुख यांचे हत्या निर्घृणपणे झाली आहे .त्याची सखोल चौकशी व्हायला हवी .दोशी लोकांवर कठोर कारवाई व्हावी .या प्रकरणातला मास्टरमाइंड शोधून काढावा ही आमची मागणी आहे .या घटनेचा तपास महत्त्वाचा आहे .याबाबत तीन समित्या नेमल्या आहेत .यंत्रणा तपास करत आहेत .मास्टरमाइंड शोधून काढावा . दोषींवर कठोर कारवाई व्हावी असेही ते म्हणालेत .कृषी घोटाळ्याचा ही सरकार तपास करत असल्याचं ते म्हणालेत .

हेही वाचा:

Delhi Election Result 2025: दिल्लीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी; पाहा एका क्लिकवर

अधिक पाहा..

Comments are closed.