सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींच
सुप्रिया सुळे आणि सारंग लखानी: नागपूरमधील प्रसिद्ध उद्योजक आणि सुप्रिया सुळे यांचे भावी जावई सारंग लखानी (Sarang Lakhani) यांच्या नोव्हँरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राज्य सरकारसोबत एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी करार केला आहे. हा करार 5 हजार 760 कोटी रुपयांचा आहे. जलसंपदा विभागाच्या (Irrigation Deparment) माध्यमातून पार पडलेल्या या करारामुळे आता राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून उदंचन जलविद्युत प्रकल्पातून 1 लाख मेगावॅट वीज (Electricity) क्षमता निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लखानी घराणे हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्योगक्षेत्रात असून यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत अनेक प्रकल्पांसाठी भागीदारी केली आहे. (Maharashtra Politics news)
हा नवा करार पार पडत असताना महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे 5 हजार 760 कोटींची गुंतवुणूक होणार असून यामधून सुमारे 1 हजार 500 लोकांना रोजगारनिर्मिती (Job employment) होणार आहे. या कराराअंतर्गत नोव्हँरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी तालुका महाड जिल्हा रायगड येथे प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. या करारावेळी सारंग लखानी यांचे वडील अरुण लखानी, जलंसपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असून उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्प (पीएसपी) माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदंचन जलऊर्जा क्षेत्रातील १२०० मेगावॅट वीज निर्मितीसाठी जलसंपदा विभाग व नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड समवेत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा… pic.twitter.com/TjQ9rEiTAt
— महाराष्ट्र DGIPR (@MahaDGIPR) १३ एप्रिल २०२६
Maharashtra Politics news: सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये
1. उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार
2. या प्रकल्पद्वारे १२०० मेगावॅट वीज निर्मिती; या प्रकल्पासाठी सुमारे ₹५,७६० कोटींची गुंतवणूक; यामधून सुमारे १,५०० रोजगारनिर्मिती
3. या कराराअंतर्गत नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी ता. महाड जि. रायगड येथे प्रकल्प उभारणी होणार
आणखी वाचा
बॅडमिंटनपटू, विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग; सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण आहेत?
आणखी वाचा
Comments are closed.