लोकल अपघात रोखण्यासाठी आश्वासने नकोत; ठोस उपाययोजना करा!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ठाणे-कल्याण पट्टय़ातील लोकलच्या प्रचंड गर्दीमुळे होणारे प्रवाशांचे मृत्यू आणि अपघाताची मुंबई उच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेतली. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी, अपघात रोखण्यासाठी आश्वासने नकोत, तर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने मध्य रेल्वेसह राज्य सरकार व संबंधित महापालिकांना याप्रकरणी चार आठवडय़ांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. गर्दीमुळे लोकलमधून पडून 27 जुलै 2025 रोजी अयान शेख या बालपणीच्या मित्राचा मृत्यू झाल्यानंतर मुंब्रा येथील ओसामा अब्दुल रहमान रावल व परळ येथील अस्थिरोगतज्ञ डॉ. सरोश मेहता आणि यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

Comments are closed.