पत्नीसाठी खास दिवस, पण ऋषिराजचा तो निर्णय; चकवा देत बँकॉकला का निघाला?, अखेर कारण आलं समोर!
शियान सोयिराज शायंत गहाळ करण्यासाठी शोध परिणामः माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत (Rushiraj Sawant) यांच्या फसलेल्या बँकॉक दौऱ्याची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. ऋषिराज सावंत यांचं 10 फेब्रुवारी रोजी अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. मात्र काहीवेळेनंतर सह पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषिराज सावंत यांचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघला होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर ऋषिराज सावंत यांच्या बँकॉक दौऱ्याबाबत विविध माहिती समोर येत आहे.
ऋषिराज सावंत यांच्या बायकोचा मंगळवारी (10 फेब्रुवारी) वाढदिवस होता आणि त्याच दिवशी ऋषिराजचे बँकॉकला जाण्याचे नियोजन होते. बँकॉकला जाऊ नकोस, असं ऋषिराजला घरातील मंडळी समजवत होते. मात्र ऋषिराज ऐकण्यास तयार नव्हता. यावरुन घरात वाद सुरु झाला. घराच्यांच्या नकारानंतरही ऋषिराजने बँकॉकचे नियोजन केले आणि दोन मित्रांसोबत तो खाजगी विमान करत निघाला. ऋषिराज आपल्याला चकवा देऊन घरातून निघून गेला, हे कळताच तानाजी सावंत यांच्या संतापाचा पारा चढला. त्यात ऋषिराज सावंत यांच्या पत्नीही खूप चिढल्या होत्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तानाजी सावंत यांनी ऋषिराजला रोखण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली-
तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री बनविले आहेत एकनाथ शिंदेंशी आधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यानांतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यालाही लवकर प्रतिसाद मिळाला नाही. मग तानाजी सावंतांनी त्यांचे नातेवाईक असलेल्या चिंचवडचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांची मदत घेतली. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांशी संपर्क झाला आणि वेगाने सूत्रं फिरायला लागली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुणे पोलिसांना सूचना देण्यात आल्या आणि त्याचवेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनाही निरोप देण्यात आला . हवेत प्रवास करत असलेलं विमान परत बोलावण्यासाठी पोलिसांना ठोस कारण हवं होतं. त्यासाठी ऋषिराजचे अपहरण झाल्याची तक्रार पुण्यातील सिंहगडरोड पोलीस ठाण्यात देण्यात आली. तानाजी सावंत यांच्या संस्थेतील राहुल करळे यांनी ही तक्रार दिली.
बँकॉक नव्हे पुण्यातच पोहोचलो-
दुसरीकडे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी डायरेकटर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कार्यालयाला सूचना केली. तिथून एअर ट्राफिक कंट्रोलला सूचना देण्यात आल्या. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून विमानाचे पायलट परीक्षित अग्निहोत्री आणि श्रेष्ठ अग्निहोत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु झाला. तोपर्यंत हे विमान बंगालच्या उपसागरावर पोहचलं होतं. अठरा लोकांना बसायची क्षमता असलेल्या या विमानात ऋषिराज त्याच्या फक्त दोन मित्रांसह प्रवास करत होता तर दोन पायलट केबिनमध्ये बसून विमानाचं नियंत्रण करत होते. एअर ट्राफिक एथॉरिटीकडून या दोन्ही पायलट्सना परत फिरण्याच्या सूचना देण्यात आल्या . मात्र ही बाब विमानात पाठीमागे बसलेल्या ऋषिराजला कळू देण्यात आली नाही. बंगालच्या उपसागरवारून विमान परत फिरलं आणि पुन्हा थेट पुण्याच्या दिशेनं निघालं. संध्यकाळी साडेचार वाजता पुणे एअरपोर्टवरून टेकऑफ केलेलं हे विमान पुन्हा पावणे नऊ वाजता पुणे एअरपोर्टवर पोहचलं. ऋषिराजचा समज मात्र आपण बँकॉकला पोहचल्याचा होता. त्यामुळे तो विमातून जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला धक्का बसला. कारण बँकॉकला जायला निघालेला ऋषिराज सव्वाचार तासांचा प्रवास करून पुन्हा पुण्यातच पोहचला होता.
संबंधित बातमी:
अधिक पाहा..
Comments are closed.