धक्कादायक! ठाण्यातील अभियंत्याचा घातपातच, पत्नी आणि मेहुण्याने मिळून काढला काटा, CCTV समोर

कराड क्राईम न्यूज : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांला कराडमध्ये कारने उडवले आहे. या अपघातात उपविभागीय अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात की घातपात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच या घटनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या अभियंत्याचा घातपातच झाला आहे. पत्नी आणि मेहुण्याने मिळून काटा काढला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. लक्ष्मण मंडले असे अभियंत्याचे नाव होतं.

नेमकं प्रकरण काय?

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील येथे मृदू व जलसंधारण विभागात अभियंता असलेल्या लक्ष्मण मंडले यांना पहाटे साडेपाच वाजता कराड शहरातील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोर  सुमारास एका भरधाव चारचाकी कारने उडवले होते. दोन वेळा त्याच्या अंगावरून कार घालवली त्यानंतर त्याच्याकडील बॅग घेतली आणि गाडी चालक पसार झाला. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे. अत्यंत भयानक रित्या अभियंत्याच्या अंगावर गाडी घातली. या घटनेनंतर घटनास्थळावरून चालक चारचाकी कारसह फरार झाला होता. यामध्ये अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. कार चालकाने पलायन केल्याने हा अपघात की घातपात असा संशय व्यक्त केला जात होता. अखेर 12 तासाच्या आत  कराड शहर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला असून हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले आहे.

या घातपातात पत्नी सुरेखा आणि मेहुणा संग्राम या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभियंता लक्ष्मण मंडले हे कराड तालुक्यातील मनव गावचे असून त्यांनी महाबळेश्वर कराड येथे काम केले आहे.

परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण अपघात, आजी, आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू

परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात आजी, आजोबांसह नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे. कोक–पिंपरी फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे शेवडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

जिंतूरच्या शेवडी गावातील भगवान बळीराम काळे, सुशिलाबाई भगवान काळे आणि त्यांचा नातू शिवम काळे हे कवडगाव येथे एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहून दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी कोक–पिंपरी फाट्याजवळ जिंतूरहून परभणीकडे जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरपरभणी एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर भगवान काळे हे दुचाकीसह एसटी बसखाली अडकल्याने घटनास्थळी अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघातानंतर एसटी बस चालकाने थेट बोरी पोलीस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.एकाच कुटुंबातील आजी, आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याने शेवडी गावावर शोककळा पसरली असून काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments are closed.