शिवसेना केडीएमसी सफाई कामगारांच्या समस्या सोडवणार, कर्मचारी कामगार सेनेची गेट मिटिंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डोंबिवली विभागातील ‘ग’ आणि ‘फ’ प्रभागातील सफाई कामगारांची एकत्रित गेट मिटिंग रामनगर येथील हजेरी शेडमध्ये आयोजित करण्यात आली होती. सफाई कामगारांच्या विविध समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माध्यमातून देण्यात आले.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, संघटनेचे सरचिटणीस सचिन बासरे, कार्याध्यक्ष अजय पवार व सुनील पवार, सुरेश तेलवाणे, संघटनेचे उपाध्यक्ष तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली ही गेट मिटिंग पार पडली. या बैठकीला ‘घ’, ‘क’ स्वच्छता अधिकारी वसंत देगळुरकर, सल्लागार नरेंद्र धोत्रे, पदाधिकारी रमाकांत जोशी, अॅड. प्रकाश सणस, शरद पांढरे, योगेश जगताप, राजेंद्र खैरे, संदीप खिस्मतराव आदी उपस्थित होते.

समस्या जाणून घेतल्या

बैठकीदरम्यान संघटनेने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा कामगारांसमोर मांडण्यात आला. यावेळी कामगारांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच त्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून ते सोडवण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी कामगारांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Comments are closed.