महापालिकेत सध्या सर्कस सुरू आहे, आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेत्री दिया मिर्झा यांचा व्हिडीओ महापालिकेच्या सोशल मीडियावरून हटवायला लावणाऱ्या भाजपचा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज जोरदार समाचार घेतला. ‘दिवाळीत फटाके न फोडता ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारा तो व्हिडीओ आणि दिया मिर्झा यांना बीएमसीने लिहिलेलं पत्र मीदेखील पाहिलेलं आहे. महापालिकेत सध्या सर्पस सुरू आहे,’ असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी आज केला.

महापौरांनी आधी स्वतःच्या गाडीवर लाल दिवा मागितला, नंतर सांगतात, ‘मी नाही मागितला, मला माहितीच नाही.’ बंगल्याच्या रिनोव्हेशनवर त्या 5 कोटींचा पालिकेचा नाहक खर्च करणार होत्या. नंतर म्हणतात, ‘मला माहिती नाही, कोणी मागितलं नाही.’ सोशल मीडियाच्या त्यांच्या हँडलवरती कितीतरी कोटी खर्च करणार होते. पेपरमध्ये आलं तर सांगतात, ‘नाही, नाही, मी नाही मागितलं.’ आणि आताचं जे पत्र गेलं ते त्यांच्याच ऑफिसमधून. म्हणजे मुंबई महानगरपालिकेतून. ती त्यांची जबाबदारी आहे आणि आता सांगतात, कोणी केलं माहीत नाही! मग शहर नेमकं कसं चाललंय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एक शहर चालवता येत नाही, देश काय चालवणार!

हे जे काही त्यांचं धर्माचं किंवा जातीचं चाललंय… जगभरातील कुठलाही महापौर बघा… शुद्ध पाणी, शुद्ध हवा, चांगले रस्ते, चांगले फुटपाथ, पार्प, गार्डन, शाळा, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर याच्यावर फो फोकस करतात. या पहिल्या महापौर आहेत, ज्या धर्मावर आणि जातीवर फोकस करतायत. म्हणजे प्रशासन नेमकं कसं चालवताय तुम्ही? भाजपला मुंबई सांभाळता येत नाही. एक शहर चालवता येत  नाही आणि देश चालवण्याचा दावा करतात, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी हाणला.

Comments are closed.