बीडमध्ये बस प्रवासात महिलेच्या जवळील 15 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; महिलेचा आक्राोश

बीड क्राईम न्यूज : बीडच्या (Beed)  मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण एसटी बस मध्ये चढत असताना 15 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. लातूर येथील सविता ढगे जालन्याच्या दिशेने एसटीने प्रवास करत होत्या. याच दरम्यान बस मध्ये बसल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर या महिलेने तात्काळ खाली उतरून पोलीस (Police) चौकी गाठून आक्रोश केला.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचं काम सुरु

या घटनेनंतर पोलिसांनी बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून घटनेचा तपास सुरू केलाय. सविता ढगे यांनी घरी कोणीही नसल्याने जवळील सर्व दागिने प्रवासात सोबत ठेवले होते. परंतु याच प्रवासादरम्यान त्यांच्या आयुष्याच्या जमापुंजीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बस स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी असते. सतत चोरीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवू लागलाय. पोलिसांनी बस स्थानक परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी प्रवाशांची आहे.

अहिल्यानगर तालुक्यात धक्कादायक घटना, एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले, पोलिसांकडून चोरी करणाऱ्या सराईत टोळीला अटक

अहिल्यानगर तालुक्यात धक्कादायक घटना घडली. शेतात काम करत असताना अज्ञात लोकांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. ताराबाई कोकाटे असं या महिलेचं नाव आहे. याबाबत या महिलेनं फिर्यादी दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असून या प्रकरणी जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीला अटक करण्यात आली आहे. खरंतर चोरी केलेले सोने दोन आरोपी सोलापूर रोडवर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोलापूर रोडवरील वाकोडी परिसरात सापळा लावून गणेश काळे, विनय काळे,आणि रोहित भोसले या तिघांना अटक केली आहे. दरम्यान, आरोपीनी तब्बल नगर शहर तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यात चोरी केल्याचे कबुल केले आहे.  चोरट्यांकडून एकूण 10 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे तर पोलिसांनी सोन्याच्या दागिण्यासह 10 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल 22 किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर संशय

आणखी वाचा

Comments are closed.