मोठी बातमी: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक
बच्चू कडू विधान परिषद निवडणूक 2026 वर: विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. याआधी राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असल्याचं दिसून येत आहे.
प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना विधान परिषदेचे शिवसेनेकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सकाळी दहा वाजता बच्चू कडू नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना बोलवण्यात आलं असून बच्चू कडू आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आज बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. पक्षप्रवेशासंदर्भात अंतिम चर्चा पदाधिकाऱ्यांसोबत बच्चू कडू करणार असून त्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्षप्रवेश करणार असल्याची माहितीही सांगितली जात आहे. चर्चेची शेवटची फेरी झाल्यानंतर पक्षविलीनीकरणासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तसेच प्रहार जनशक्ती संघटना कायम राहणार अशी माहितीही समोर आली आहे.
एकनाथ शिंदे बैठकमध्ये सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला-
विधान परिषद उमेदवार संदर्भात शिवसेनेची रात्री उशिरा चालली खलबतं सुरु होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकमध्ये सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. तर रात्री उशिरा चाललेल्या बैठकीत बच्चू कडू यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसऱ्या नावावर अजूनही निर्णय नाही. मात्र शीतल म्हात्रे आणि नीलम गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. दोघांपैकी एका नावावर शिक्का मोर्तब होण्याची दाट शक्यता आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. (Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026)
बच्चू कडू एकनाथ शिंदेंची ऑफर स्वीकारणार- (Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026)
बच्चू कडू हे शिवसेनेत नसल्यामुळे त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यास पक्षातील अनेकांनी विरोध केला होता. त्याऐवजी बच्चू कडू यांना त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत (Shivsena) विलीन करायला सांगावी, अशी भूमिका शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेत विलीन करण्यासंदर्भात बराच खल झाला.
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)
- निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
- उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
- उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
- मतदानाची तारीख: 12 मे 2026
- मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
- मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
- निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.