तुकाराम मुंढेंचा ॲमेझॉन इंडियाला मोठा दणका, मुदतबाह्य अन्नपदार्थ विकणाऱ्या गोदामाचा थेट परवाना
भिवंडी FDA छापा: अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यात बेकायदेशीर आणि मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांविरोधात कारवायांचा धडका सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून भिवंडी तालुक्यातील सरवली येथील ‘ॲमेझॉन रिटेल इंडिया’ (Amazon Retail India) या नामांकित कंपनीच्या गोदामावर अन्न सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुदतबाह्य झालेले आणि मानवी आरोग्यास घातक ठरणारे अन्नपदार्थ नष्ट न करता, नागरिकांची दिशाभूल करून ते पुन्हा विक्रीसाठी अन्नसाखळीत वळवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ॲमेझॉन रिटेलच्या फॅसिलिटी मॅनेजरसह दोघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरवली येथील ‘ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.’ आणि ‘आर. के. ट्रेडर्स’ यांच्या संगनमताने मुदतबाह्य झालेले अन्नपदार्थ नष्ट न करता ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याची खात्रीशीर माहिती अन्न सुरक्षा पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी मध्यरात्री पथकाने या गोदामावर अचानक धाड टाकली.
Bhiwandi FDA छापा : बनावट प्रमाणपत्र सादर करून फसवणूक
या कारवाईदरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. ‘मे. आर. के. ट्रेडर्स’चे मालक रहमान के. यांनी कराराचे पालन न करता, हे मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट केल्याचे खोटे विल्हेवाट प्रमाणपत्र सादर केले होते. प्रत्यक्षात मात्र, हे मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे अन्नपदार्थ बाजारात पुन्हा विक्रीसाठी पाठवले जात होते. या संपूर्ण काळ्या बाजारात ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि. चे कालबाह्य व खराब अन्नपदार्थ विल्हेवाट हाताळणारे संबंधित कर्मचारी आणि पश्चिम क्षेत्राचे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर हे थेट सामील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
भिवंडी FDA छापा : पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद वसंत कांडेलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात ‘मे. आर. के. ट्रेडर्स’चे मालक रहमान के. आणि ‘ॲमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.’चे फॅसिलिटी मॅनेजर सोमशेखर बसवराज कोन्नूर या दोघांविरोधात गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318 (4), 274, 3(5) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 26(1), 26(2)(आय), 27(1), 27(3)(ई) आणि 31(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे अन्नपदार्थांचा काळा बाजार करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Bhiwandi FDA Raid: गोदामाचा परवाना रद्द
दरम्यान, सरवली (भिवंडी) येथील ज्या अमेझॉन रिटेल इंडिया प्रा. लि.च्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली, त्या विशिष्ट आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. मुदतबाह्य व खराब अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी वळवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, हा निर्णय केवळ संबंधित गोदामाच्या परवान्यापुरताच लागू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.