मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
नवी मुंबई : मुंबईसह उपनगरात एकीकडे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना दुसरीकडे नवी मुंबईत्यामुळे अपघाताची (Accident) भीषण दुर्घटना घडली आहे. येथील तळोजा (Navi mumbai) सेक्टर 10 मध्ये भीषण अपघात झाला असून कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कारचालकाने 8 ते 10 जणांना उडवले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून काहींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
तळोजातील या अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. दरम्यान, अपघातानंतर कारचालक गाडी सोडून घटनास्थळावरुन फरार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा
Comments are closed.