… म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा आणि महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक अशोक खरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात निवेदन दिले. दुसरीकडे अशोक खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, अशोक खरातचा मुक्का 29 मार्चपर्यंत एसआयटीच्या पोलीस कोठडीतच असणार आहे. आणखी सखोल तपास गरजेचा असल्याने, खरातच्या शिवनिका संस्थेच्या सदस्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याने ही कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या संस्थेवरील सदस्यांचीही चौकशी होईल, असे सांगितले. त्यामुळे, याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांचीही चौकशी होणार आहे.
अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी होणार असून नाशिक पोलिसांकडून शिवनिका स्ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार आहे. या ट्र्स्टमध्ये रुपाली चाकणकर या देखील सदस्य असल्यामुळे आता त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडून सभागृहात निवेदन देखील देण्यात आलं. दरम्यान यावेळी बोलताना खरात याच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच, खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. या फोटोनंतर सोशल मीडियातून, विरोधी पक्षातील महिला नेत्यांनीही रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला होता. रुपाली चाकणकर यांनीही आपला राजीनामा दिला असून आता त्यांचीदेखील चौकशी होणार असल्याची माहिती आहे. कारण, शिवनिका संस्थेवर सदस्य असलेल्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. त्यामध्ये, रुपाली चाकणकर ह्या देखील सदस्य पदाच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत.
ईशान्येश्वर मंदिराच्या संपत्ती वाढ
भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याचे अनेक काळे कारनामे समोर आले. महिलांचे लैंगिक शोषण करत असतानाच मोठी माया देखील या भोंदूबाबाने जमवली आहे. 2009 मध्ये स्थापन केलेल्या शिवनिका संस्थानचा कारभार आता तपासण्याची गरज आहे. सुरुवातीच्या काळात अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या शिवनिका संस्थान 2025 पर्यंत कोट्यधीश झालंच कसं हा प्रश्न आता समोर येतोय. या संस्थांनवर 2009 पासून असणाऱ्या विश्वस्त मंडळासह आजपर्यंतच्या सर्वच कार्यकारी मंडळाची चौकशी झाली तरच सगळे स्पष्ट होईल.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.