मुंबई महानगरपालिकेसाठी आमच ठरलंय; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा निर्धार, म्हणाले….

शंभूराज देसाई इतक्या बॅकफूटवर उबाठा गेली आहे, त्यामुळे एकमेकांच्या माथ्यावर खापर फोडण्याचे काम सुरू आहे. काँग्रेस म्हणते काय करायचं करू द्या, राष्ट्रवादी म्हणते आम्ही देखील  वेगळे लढू. विधानसभेत या तिन्ही पक्षांचे एकमत नसल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत त्यांना जे अपयश आलं  त्यामुळे त्यांचे त्यांना कळेना. पण महायुतीचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल. मुंबई महानगरपालिकेसाठी आमच ठरलंय. महायुतीचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचा. तिघांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकलेला दिसेल. असा विश्वास व्यक्त करत पर्यटन मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आगामी महापालिका निवडणुकांबाबत भाष्य केलंय.

शिंदे साहेबांनी मला सांगितले आहे की….

निवडणूक झाल्यानंतर आम्ही सर्व आमदारांनी बैठक घेवून कोणाला मंत्री पद द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय शिंदे साहेब यांना द्यायचा निर्णय घेतला. खातं कुठलेही मोठे आणि लहान नसतं. शिवसेनेच्या खात्यातील उत्पादन शुल्क खातं  राष्ट्रवादीच्या वाटेला गेलं आहे.  पण गृहनिर्माण खात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आले आहे. जी खाती आहेत ती सर्वच खाती तोलामोलाची आहेत. राज्यामध्ये पर्यटन खाते देखील खूप महत्त्वाचे आहे. लोक आता टुरिझमकडे वळायला लागले आहेत. टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्था वाढली आहे. शिंदे साहेब यांनी मला सांगितले आहे, चांगलं काम करायचं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरेसा निधी तुमच्या विभागाला दिला जाईल, असे सांगितले आहे.

हात जोडून चांगले काम करूया : शंभूराज देसाई

आम्ही निवडून आल्या आल्या सर्व अधिकार एकनाथ शिंदे साहेब यांना दिले. आमच्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेब यांना आहे. एक-दोन दिवसात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची बैठक होईल आणि पालकमंत्री संदर्भात निर्णय घेतील. आमच्या तीन पक्षात मंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती. तसंच पालकमंत्री पदावरून आमची कोणतीही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे. पण याचा सर्वस्वी निर्णय आमचे नेते घेतील. आम्ही पक्ष शिस्त पाळणारे आहोत. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मंत्री त्यांना जो विभाग मिळाला त्यामध्ये ते चांगलं काम करून दाखवतील. हातात हात घालून आम्ही चांगले काम करू.

जरा धीर धरा दोन दिवसात पालकमंत्री पदाचे खाते वाटप

पालकमंत्री पदाचे अधिकृत नावे येईपर्यंत कोणीही काम करू शकत. पण याचा अंतिम निर्णय तिघेजण मिळून घेणार आहेत. खाते वाटप होईपर्यत चार दिवस याला हे खाते मिळणार त्याला ते खाते मिळणार अशा बातम्या सुरू होत्या. पण खातं देत असताना  समतोल राखण्यात आला आहे. जरा धीर धरा दोन दिवसात पालकमंत्री पदाचे खाते वाटप होईल. अशी प्रतिक्रिया देत ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांना जो आरोप करायचा तो करू द्या, पण सर्व खाती सारखे आहेत. कोणतेही खाती मंत्रिमंडळाचे संयुक्तिक जबाबदारी आहे. कोणताही खाते हेवी वेट नाही सर्व समान आहेत.

अधिक पाहा..

Comments are closed.