तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर दरोडा, दिव्यात प्रचंड घबराट; मध्यरात्री घरात घुसून ९ दरोडेखोरांची लुटालूट
दिव्यातील आगासन गावात मध्यरात्री नऊ दरोडेखोरांनी व्यावसायिक तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवत अडीच तोळे सोने आणि ८४ हजारांची रोकड असा २ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोड्याच्या घटनेने दिव्यात प्रचंड घबराट पसरली आहे.
दिव्यागामधील आगासन गावात व्यावसायिक तुकाराम मुंडे यांचा बंगला आहे. या बंगल्यात १७ नोव्हेंबरला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंगल्यातील देवघराच्या मागील बाजूच्या खिडकीची जाळी तोडून एका दरोडेखोराने आत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा आतून उघडून त्याने अन्य आठ साथीदारांना बंगल्यात घेतले. अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील या नऊ दरोडेखोरांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील एक लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ८४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
Comments are closed.