चांदा ते बांदा एफडीएच्या कारवायांचा धडाका! राज्यभरात 21 आस्थापनांवर धड, 17 जणांना अटक, वाचा कुठ
FDA छापे कारवाई बातम्या: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी भेसळखोर आणि बनावट उत्पादन विकणाऱ्यांविरोधात राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. जवळपास दररोज राज्याच्या विविध भागात एफडीएच्या पथकांकडून धाडी (FDA Raid) टाकल्या जात आहेत. परिणामी अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाईचं नागरिकांकडून जोरदार स्वागत आहे देखील केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील 21 आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाच्या धाडी टाकत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. यात 7 लाख 43 हजार 117 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. तर विक्री, वितरण आणि वाहतुकीप्रकरणी 17 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान 3 वाहनेही जप्त करण्यात आली आहे.
FDA Raid Action News : राज्यभरात 12 एफआयआर, बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक आस्थापनांची तपासणी
अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई करत राज्यभरात 12 एफआयआर दाखल करण्यात आले आहे. तर 7 आस्थापना देखील सील करण्यात आलं आहे. बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक 13 आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये बृहन्मुंबईत 8 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख रुपयांहून अधिक माल जप्त करण्यात आला आहे. नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहने देखील जप्त करण्यात आली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार हि कारवाई करण्यात आली आहे. सोबतचप्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
विभागनिहाय कारवाई (FDA Action News)
मुंबई
13 आस्थापनांची तपासणी
8 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले
₹1,00,417 चा माल जप्त
8 जणांना अटक
5 आस्थापना सील
कोकण
1 आस्थापनेवर कारवाई
₹1,32,970 चा माल जप्त
1 जण अटक
1 आस्थापनेवर कारवाई
₹2,565 चा माल जप्त
1 जण अटक
1 आस्थापना सील
₹1,64,434 चा माल जप्त
1 जण अटक
1 वाहन जप्त
2 आस्थापनांवर कारवाई
₹1,24,080 चा माल जप्त
3 जण अटक
1 आस्थापना सील
1 वाहन जप्त
₹1,91,445 चा माल जप्त
1 जण अटक
1 वाहन जप्त
2 आस्थापनांवर कारवाई
₹27,206 चा माल जप्त
2 जण अटक
FDA Action News: एकूण कारवाई
21 आस्थापनांची तपासणी
16 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ आढळले
₹7,43,117 चा माल जप्त
17 जणांना अटक
12 एफआयआर दाखल
7 आस्थापना सील
3 वाहने जप्त
इतर महत्वाच्या बातम्या
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.