आजपासून तुकाराम सुर्वे क्रिकेट स्पर्धा
ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लब आयोजित माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे यांच्या स्मृती क्रिकेट स्पर्धेला 21 नोव्हेंबरपासून दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत 16 वर्षे वयोगटातील चार संघांचा समावेश असून ही दोन दिवसीय स्पर्धा 6 डिसेंबरपर्यंत रंगणार आहे.
या स्पर्धेत तुकाराम सुर्वे यांचे समकालीन सहकारी अनंत धामणे, गोविंद पाटील, सदाभाऊ सातघरे आणि गणाभाऊ भुवड यांच्या नावाने चार संघ खेळतील. या संघांना प्रथमेश ढाके, किरण साळगावकर, किरण पांडे आणि संग्राम शिर्के हे प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत.
चार संघाच्या प्रत्येकी 16 खेळाडूंच्या निवड चाचणीत 16 वर्षे वयोगटाचे जिह्यातील सुमारे चारशे युवा क्रिकेटपटू सहभागी झाले होते. या खेळाडूंची संतोष जगताप, अझीम खान, जयदीप पाल, प्रशांत सावंत आणि केरसी पावरी या निवड समितीने स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली.
Comments are closed.