Asia Cup Rising Star: तिलक वर्मा-कुमार कुशाग्र यांची शतके आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील विक्रमांमध्ये नोंदवली जाणार का?
नेपाळविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्मा (Tilak Verma) आणि कुमार कुशाग्र (Kumar Kushagra) यांनी इंडिया-ए संघाकडून शतके झळकावली. (IndiaA vs Nepal A) या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 300 धावांचा टप्पा पार केला. तिलक वर्मा भारतीय वरिष्ठ संघाकडूनही खेळतो, मात्र कुमार कुशाग्रने अद्याप वरिष्ठ भारतीय संघात पदार्पण केलेले नाही. आता या दोघांनी झळकावलेली शतके त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील विक्रमांमध्ये नोंदवली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
क्रिकेटमधील एखाद्या सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा मिळण्यासाठी एक महत्त्वाची अट असते. या सामन्यात दोन्ही देशांचे वरिष्ठ संघ खेळणे आवश्यक असते. म्हणजेच कोणत्याही देशाचा ‘अ’ किंवा ‘ब’ संघ खेळत असेल, तर त्या सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा मिळत नाही.
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत (Asia Cup Rising star) भारत आणि पाकिस्तानसह काही देशांचे ‘अ’ संघ सहभागी झाले आहेत, तर काही देशांचे मुख्य संघ खेळत आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सर्व देशांचे संघ एकाच स्तराचे नाहीत. परिणामी, या स्पर्धेतील कोणत्याही सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा मिळत नाही.
त्यामुळे या स्पर्धेत झळकावलेल्या शतकांची नोंदही खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय विक्रमांमध्ये केली जात नाही. याच कारणामुळे तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांची शतके त्यांच्या आंतरराष्ट्रीय विक्रमांमध्ये समाविष्ट होणार नाहीत.
नेपाळविरुद्धच्या सामन्यात इंडिया-ए संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने अवघ्या 42 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. वैभव सूर्यवंशी (26), अभिषेक शर्मा (9) आणि आयुष बदोनी (2) हे तिघेही बाद होऊन माघारी परतले होते.
क्रिकेटमधील एखाद्या सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा मिळण्यासाठी एक महत्त्वाची अट असते. या सामन्यात दोन्ही देशांचे वरिष्ठ संघ खेळणे आवश्यक असते. म्हणजेच कोणत्याही देशाचा ‘अ’ किंवा ‘ब’ संघ खेळत असेल, तर त्या सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा मिळत नाही.
आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह काही देशांचे ‘अ’ संघ सहभागी झाले आहेत, तर काही देशांचे मुख्य संघ खेळत आहेत. त्यामुळे या स्पर्धेत सर्व देशांचे संघ एकाच स्तराचे नाहीत. परिणामी, या स्पर्धेतील कोणत्याही सामन्याला आंतरराष्ट्रीय सामन्याचा दर्जा मिळत नाही.
त्यामुळे या स्पर्धेत झळकावलेल्या शतकांची नोंदही खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय विक्रमांमध्ये केली जात नाही. याच कारणामुळे तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांची शतके त्यांच्या आंतरराष्ट्रीय विक्रमांमध्ये समाविष्ट होणार नाहीत.
अशी झाली तिलक आणि कुशाग्र यांची शतकी खेळी!नेपाळविरुद्धच्या सामन्यात इंडिया-ए संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने अवघ्या 42 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. वैभव सूर्यवंशी (26), अभिषेक शर्मा (9) आणि आयुष बदोनी (2) हे तिघेही बाद होऊन माघारी परतले होते.
या परिस्थितीत भारतीय संघाला 200 धावांचा टप्पा गाठणेही कठीण वाटत होते. मात्र, तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी शतके झळकावत परिस्थिती सावरली.
कुमार कुशाग्रने 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने 6 चौकार आणि 4 षटकार मारत 107 धावा केल्या.
या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 191 चेंडूंमध्ये 206 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर इंडिया-ए संघाने 50 षटकांत 9 विकेट गमावत 332 धावांचा डोंगर उभारला.
Comments are closed.