थलपति विजयला राज्यपालांनी पुन्हा रिकाम्या हातीच माघारी पाठवलं, सत्तास्थापनेसाठी तीच अट सांगितली
TVK Vijay Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या प्रस्थापित पक्षांना झटका देत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेला तमिळगा वेत्री कळघम (TVK) हा पक्ष आणि त्याचे प्रमुख असलेल्या विजय (Vijay Thalapathy) हे सध्या चांगलेच पेचात सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीत टीव्हीके राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आल्याने सत्तास्थापनेसाठी त्यांना राज्यपालांनी आमंत्रित करणे अपेक्षित होते. आधी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नंतर विधानसभेतील बहुमत चाचणीला सामोरे जाणे, ही सर्वसाधारण आणि प्रचलित प्रक्रिया आहे. मात्र, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी टीव्हीकेच्या विजय यांना बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करा आणि त्यानंतरच सत्ता स्थापन करता येईल, अशी अट घातली आहे. (Tamil Nadu Election Result 2026)
विजय थलपति कालदेखील राज्यपालांच्या भेटीला गेला होता. तेव्हा राज्यपालांनी सर्वप्रथम ही अट समोर ठेवली होती. त्यामुळे टीव्हीके पक्षाकडून करण्यात आलेले आजच्या शपथविधीचे नियोजन पाण्यात गेले. तरीही विजय हे आज पुन्हा एकदा राज्यपालांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, राज्यपालांनी आपली भूमिका कायम असल्याचे सांगितले. बहुमत सिद्ध केल्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकता. मला तामिळनाडूत स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर बहुमत सिद्ध कराल, तितक्या लवकर तुम्ही शपथ घेऊ शकता, असे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे सत्तास्थापनेच्या आशेने राज्यपालांकडे गेलेल्या विजय यांना पुन्हा एकदा रिकाम्या हाती माघारी परतावे लागले आहे.
आज तामिळनाडूच्या नेहरु स्टेडियमवर टीव्हीके पक्षाने विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीची तयारी केली होती. मात्र, राज्यपालांच्या अटीमुळे हा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. काही कार्यकर्त्यांनी तामिळनाडूतील राजभवनासमोर निषेधाचे फलक झळकावले.
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी किती जागांची गरज?
विजय थलपति यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोघांचे एकत्रित संख्याबळ 113 इतके झाले आहे. तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 च्या संख्याबळाची गरज आहे. त्यामुळे सध्या टीव्हीकेला बहुमतासाठी पाच जागा कमी पडत आहेत. याशिवाय, विजय थलपति दोन मतदारसंघातून निवडून आल्यामुळे टीव्हीकेचे प्रत्यक्ष संख्याबळ 107 इतकेच मोजले जाऊ शकते, असा अंदाज आहे.
तामिळनाडू विधानसभेतील पक्षीय बलाबल- (Tamilnadu Election Result 2026)
टीव्हीके-108
द्रमुक- ५९
अण्णाद्रमुक- 47
काँग्रेस- 5
इतर-08
एकूण जागा-234
आणखी वाचा
TVK सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी अट टाकून तिढा वाढवला, विजय थलपति मोठं पाऊल उचलणार?
आणखी वाचा
Comments are closed.