कर्जमाफी झाल्यावर आंदोलन करण्यात काय अर्थ, 50 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली : उदय सामंत
रोहित पवारांवर उदय सामंत: संपूर्ण कर्जमाफीसाठी रोहित पवार (रोहित पवार) यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं आहे. यावर मंत्री उदय सामंत (उदय सामंत) यांनी प्रतिक्रिया दिली. 50 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. आचारसंहिता असल्यामुळं आम्हाला सांगता येत नाही. कर्जमाफी झाल्यावर आंदोलन करण्यात काय अर्थ आहे. कर्जमाफीच्या अगोदर आंदोलन केलं असतं तर अर्थ होता असे सामंत म्हणाले. एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी कोणी आंदोलन करु नये. अटीच्या बाबतीमध्ये पात्र शेतकऱ्यांना कुठलेही अडचण येणार नाही याची दक्षता महाराष्ट्र सरकार घेईल असे सामंत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी रोहित पवारांनी आंदोलन सुरु केले आहे. आज सकाळपासून रोहित पवारांनी हे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.
संजय राऊतांवर सामंतांची खोचक टीका
संजय राऊत यांचं ऐकण्यापेक्षा राजेंद्र राऊत यांचं सध्या आपण ऐकू. संजय राऊतांचं तेच तेच ऐकतोय, चार वर्षात फरक पडला नाही. ते 60 वरून 20 वर आले आम्ही 60 वर गेलो अशा शब्दात मंत्री उद. सामंत यांनी खासदार संजय राऊतांचा समाचार घेतला. त्यांच्या 32 नगरपालिका होत्या. त्यांच्याच बोलण्यामुळं आता 6 वर आल्या असल्याचे सामंत म्हणाले. सोलापुरात महायुतीची बैठक झाली, यावेळी सामंत बोलत होते.
पंढरपूचे भगिरथ भालकेंचे नगराध्यक्ष आणि सदस्य बैठकीला उपस्थित
सोलापुरात खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीची बैठक पार पडली. राजेंद्र राऊत यांना मोठ्या फरकाने निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. पंढरपूचे भगिरथ भालकेंचे नगराध्यक्ष आणि सदस्य बैठकीला उपस्थित होते. पण काय नाराजगी असेल तर ती दूर केली जाईल असे सामंत म्हणाले. मोठ्या मनानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्वाही दिली आहे. शिवसेनाला निधीच वाटप केला जाईल असे सामंत म्हणाले.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. नाशिक आणि जळगावमध्यें महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे सामंत म्हणाले. टेनिस बॉल खेळणाऱ्या पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने स्पर्धा सुरु करणार असल्याचे सामंत म्हणाले. 36 जिल्ह्यातील 36 पत्रकारांच्या टीम घेऊन आम्ही ही स्पर्धा आयोजित करु असे सामंत म्हणाले. विलनिकरण हा त्या त्या पक्षांचे प्रश्न आहेत. त्याचा निर्णय ते घेतील असे सामंत म्हणाले.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.