वैष्णवी हगवणेच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन आला, म्हणाले, ‘काळजी करू नका, आम्ही तिला….’
वैष्णवी हागावणे मृत्यू पुणे: वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी गेल्यानंतर तिला छळणाऱ्या हगवणे कुटुंबियांचे आता एका पाठोपाठ एक धक्कादायक प्रताप समोर येऊ लागले आहेत. अशातच या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असताना त्याचे पडसाद आता राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील उमटतांना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कस्पटे कुटुंबीयांना फोन करून फोनवरून संवाद साधला आहे. ‘वैष्णवीबाबत झालेली घटना दुर्दैवी आहे. शिवसेना परिवार तुमच्यासोबत आहे. सरकारकडे पाठपुरावा करू, काळजी करू नका, वैष्णवीला न्याय मिळवून देऊ, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कस्पटे कुटुंबीयांना धीर दिला आहे.
दरम्यान, ‘या प्रकरणी विधानसभेत आवाज उठविला जाईल,’ अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या वेळी दिली. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी वैष्णवी यांच्या आई-वडिलांची वाकड येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि कस्पटे कुटुंबीयांना धीर दिला आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नेमकं काय?
वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा नवरा शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे यांनी आर्थिक कारणांमुळे तिला मारहाण केली. एकदा तिच्या वडिलांनी विचारले, “वैष्णवीच्या अंगावर इतक्या जखमा कशा?” यावर राजेंद्र आणि शशांक म्हणाले, “आधीच सांगितलं होतं, आम्हाला पैसे पाहिजेत. तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायचं? म्हणूनच तिला मारून टाकलं.” जावयाचे हे शब्द वडिलांचं काळीज चिरत गेले. सासरच्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती.
काही काळ त्यांनी लेकीचा विचार करून पैसे दिले, पण जेव्हा दोन कोटी रुपयांची मागणी झाली आणि त्यांनी नकार दिला, तेव्हा छळ अधिक वाढला. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या मुलाला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, 7.5 किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.