… तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष वर्धापन दिन सोहळ्यात संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी पालघर प्रकरणात शिवसेना आणि हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तर, एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यातील अमित शाह भेटीवरुन उद्धव ठाकरेंनी टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की मी मुद्दाम ज्येष्ठ हा शिवसैनिक शब्द वापरला नाही. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आहे की माणूस वयाने म्हातारा होत नसतो तर विचाराने थकतो. यातले अनेक शिवसैनिक बाळासाहेबांच्या बाजूला कवचासारखे असायचे. तुम्ही शिवसेना प्रमुखांसोबत होतात म्हणून आम्ही घरी निर्धास्त होतो. शिवसेनाप्रमुखांकडे बघायची तर हिम्मत कोणाची नव्हती..आताही कोणाकडे काठी हातात नाही, तेव्हा काय काय हातात होत हेच सर्वांना माहिती आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
वेडात मराठे वीर दौडले सात ही गाणी आपण ऐकली आहेत. तुम्हाला आठवत असेल जनता पक्षाचा तो काळ होता. शिवाजी पार्कवर मोरारजी देसाईंची सभा झाली. 1977 च्या काळात जनता पक्षाची लाट होती. प्रचंड समुदाय तेव्हा शिवसेना भवनावर जमला आणि दगड फेक झाली. तेव्हा हाताच्या बोटावर जमलेले शिवसैनिक तिथं घुसले आणि त्यांनी ते उधळून लावलं, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
ते दिल्लीचेही बूट चाटतात, ते भगव्याच्या औलदीचे नाहीत
आजचा काळ वेगळा आहे,जांच्यासोबत 25 वर्ष ज्यांना सोबत हिंदुत्व या एका शब्दासाठी चोचले ऐकले मान्य केलं. महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हते त्यांना खांद्यावर घेऊन खेड्यापाड्यात घेऊन फिरलो. ते वरती चढल्यानंतर आपल्याला लाथा मारायला लागले, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाने दिल्ली थरथरत होती, महाराष्ट्राच्या गीतात जे आहे दिल्लीचेही तख्त राखतो तो खरा मराठा, आपण मध्ये मध्ये बघतो ते दिल्लीचेही बूट चाटतात, ते भगव्याच्या औलदीचे नाहीत, गद्दार आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. इंडिया बैठकीचं आमंत्रण आलं तर जातो नाही तर खासदारांना भेटायला जातो. आता जे दिल्लीला जातात कायम जातायत, मुजरे मारायला तिकडे जातात. त्यांचे हुजरे काय विचार विचार पुढं नेणार आहेत, असा सवाल ठाकरेंनी केला.
भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेची माफी मागावी
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देश नासवून टाकला जातोय.मला भीती वाटतेय कि अराजकेकडे जातोय कि आपण? कोणालाही पक्षात घेत आहेत. आमच्याकडे अनेक मुस्लीम कार्यकर्ते आहेत. दसऱ्याच्या भाषणात बोललेलो. आपण काही केलं किंवा दुसऱ्यांनी केलं तर लव्ह जिहाद भाजपनं केल तर अमरप्रेम असं सुरु आहे. पालघर येथे भाजपने एकाला प्रवेश दिला त्या चौधरीला भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपनं साधू हत्यांकाडातील आरोपी म्हणून किती बोंबाबोंब केली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे बेंबीच्या देठापासून बोंबलत होते. आता त्याच चौधरीला भाजपमध्ये प्रवेश दिला. हा हिंदुत्वाचा अपमान नाही. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात स्थानिक पातळीवर चौकशी केली होती. तो चौधरी या हत्याकांडात सामील असेल तर प्रवेश का दिला? आणि नसेल तर प्रवेश का थांबवला? त्याचा संबंध नसेल तर भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी चौधरीची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागितली पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. संपूर्ण देशात आगडोंब उसळवायला निघाला होता, हत्यांकाड दुर्दैवी घटना होती. तोच चौधरी तुमच्याकडे आला की पवित्र झाला.धाराशिवमध्ये ड्रग्ज माफियाला नगराध्यक्षपदाचा उमेदवार केला, अशी टीका ठाकरेंनी केली.
आणखी वाचा
Comments are closed.