तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली, म्हणाला, उद्धव साहेब….

उद्धव ठाकरे शिवसेना : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय फोडाफोडीला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपने ठाकरे गटाच्या दहिसरमधील नगरसेवकपदाच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांना आपल्या पक्षात घेतले होते. उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आपल्या मनाला वेदना होत असल्याचे तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) यांनी म्हटले होते. यानंतर आता नवी मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नेते मनोहर मढवी (M K Madhvi) यांनीही अशाचप्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडली आहे.

मी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत आहे. मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामं कुठेतरी झाली पाहिजेत. मी माझ्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी आज एकनाथ शिंदे (मराठी) साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहे. यापुढे मी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन. उद्धव ठाकरे यांच्याबाबत माझ्या मनात कुठलीही नाराजी नाही. बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी माझ्या मनात जो आदर होता, तो कायम राहील, असे मनोहर मढवी यांनी पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (Navi Mumbai Mahanagarpalika election 2025)

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुंबईतील सर्व आमदार, खासदार, माजी नगरसेवकर, विभागप्रमुख, शाखा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने लोकसभा विभागवारीनुसार मेळावे आणि बैठांचे सत्र सुरू होणार आहे.

ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील निवडणुका संपल्या आहेत  त्या मंत्र्यांना विधानसभा विभागवारीनुसार शाखा भेटी करणयाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच निवडणुकांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या विशिष्ट समाज, व्यापारी संघटना यांच्याही बैठका आणि भेटीगाठींच्या खासदार आणि आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातही महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून शिंदे गटाकडून बैठकांचे सत्र होणार सुरु होणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ठाण्याची चर्चा खासदार नरेश म्हस्के, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे, मीरा भाईंदरसाठी मंत्री प्रताप सरनाईक, नवी मुंबई साठी खासदार नरेश म्हस्के तर वसई विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक हे भाजपसोबत चर्चा करतील.

आणखी वाचा

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर

आणखी वाचा

Comments are closed.