अमेरिकेकडून 657 प्राचीन कलाकृती परत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेने हिंदुस्थानला सुमारे 1.4 कोटी डॉलर किमतीच्या 657 प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. या कलाकृती तस्करीच्या माध्यमातून  परदेशात पोहोचवण्यात आल्या होत्या. तपासाअंती त्या जप्त करून परत आणण्यात आल्या.

मॅनहटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नी एल्विन ब्रॅग यांनी या कलाकृती परत करण्याची घोषणा केली. न्यूयॉर्कमधील हिंदुस्थानच्या वाणिज्य दूतावासाच्या काwन्सिलर राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत कलाकृती परत करण्यात आल्या. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या ऑन्टिक्विटीज ट्रफिकिंग युनिटने आतापर्यंत 6200हून अधिक सांस्कृतिक वस्तू जप्त केल्या आहेत, ज्यांची एकूण किंमत 485 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे. यापैकी 5900हून अधिक वस्तू 36 देशांना परत करण्यात आल्या आहेत.

Comments are closed.