गाईचं वासरु दाखवतो म्हणून चिमुरडीला गोठ्यात नेलं अन्… ते सीसीटीव्ही फुटेज समोर येताच अख्खं कु
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Bhor Crime News) करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे आणि सोबतच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या (Bhor Crime News)अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचं काय करायचं ते बघून असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तर नसरापूर गावातल्या महिला चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे संतापल्या (Bhor Crime News) आहेत. आमच्या समोर नराधमाला फाशीची शिक्षा द्या. आमची सुरक्षा करता येत नसेल तर तर लाडकी बहीण म्हणून काय उपयोग काय असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला. याची मुलीला महिलांनी खेळताना बागडताना बघितलं आहे. त्यामुळे महिला काहीशा भावुक झालेला देखील दिसून आल्या.(Bhor Crime News)
Bhor Crime News: वासरू दाखवतो म्हणून हात धरून चिमुकलीला गोठ्यात नेलं
नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच मुली सोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता मात्र साडेतीन वाजताच ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्ख कुटुंब हादरलं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातली, रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढली, त्यानंतर गावकऱ्यांनी मोर्चा मागे घेतला, पण आज या अत्याचाराचा विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा सुरू झाला आहे. गावातील भैरवनाथ मंदिराजवळ हा मोर्चा सुरू झाला.
Bhor Crime News: आजीच्या घरी सुट्टीला आली होती
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, दगडाने ठेचून तीला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर तीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही (cctv) फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे.
ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला आमच्या हातात अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यावेळी आंदोलकांना स्वतः एसपी संदीप सिंग गिल यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नागरिकांना रास्ता रोको स्थगित केला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली.
आणखी वाचा
Comments are closed.