35 वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजलेली ही मास्टरपीस मालिका, ज्याला आहे IMDb वर 8.9 रेटिंग – Tezzbuzz

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर साहित्य, संस्कृती आणि सामाजिक समस्या छोट्या पडद्यावर अत्यंत गांभीर्याने सादर केल्या जात होत्या. अश्यामध्ये एक असा कार्यक्रम होता जो साधेपणा असलेला तरीही प्रेक्षकाचा लोकप्रिय होता.

हि मालिका म्हणजे 1990 मध्ये प्रसारित झालेली प्रसिद्ध ‘मुल्ला नसरुद्दीन’. या मालिकेला आता 35 वर्ष पुर्ण झाली आहे.मुल्ला नसरुद्दीन हे पात्र केवळ एक काल्पनिक पात्र नाही; त्याच्या कथांची मुळे तुर्कस्तानपासून चीनपर्यंतच्या लोककथांमध्ये रुजलेली आहेत. तो एक तत्त्वज्ञ आणि ज्ञानी माणूस म्हणून ओळखला जातो, जो आपल्या बुद्धी आणि तर्काने अत्यंत गुंतागुंतीच्या समस्याही क्षणार्धात सोडवू शकत असे. जेव्हा 1990 मध्ये दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे पदार्पण झाले, तेव्हा त्याने विनोदाची व्याख्याच बदलून टाकली.

'मुल्ला (mulla)नसरुद्दीन’ ही मालिका केवळ हसविण्यासाठी नव्हती, तर प्रत्येक कथेत समाजासाठी एक गहन संदेश होता. या शोला IMDb वर 8.9 रेटिंग मिळाले, जे त्याची उल्लेखनीय कामगिरी स्पष्टपणे दर्शवते. ‘मुल्ला नसरुद्दीन’चे यश केवळ त्याच्या कलाकारांमुळेच नव्हे, तर एका उत्कृष्ट तांत्रिक टीममुळेही होते. आणि प्रेक्षकांच्या पाठिब्यामुळे देखील ते शक्य झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

कंगना राणौत स्टारर ‘भारत भाग्य विधाता’ इम्तियाज अलीच्या चित्रपटाशी देणार टक्कर, निर्मात्यांनी सांगितली तारीख

Comments are closed.