आज जागतिक ‘पेंग्विन दिन’, दोन लाखांवर पर्यटक, एक कोटीवर उत्पन्न पेंग्विनमुळे उद्यानाला ‘सुगीचे दिवस’!

पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात दहा वर्षांपूर्वी पेंग्विन आणल्यापासून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची दिवसभराची संख्या पाच ते दहा हजारांवरून थेट 30 हजारांपर्यंत गेली आहे. त्यामुळे उद्यानाच्या मासिक उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. जानेवारीत या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या 2 लाख 90 हजार 673 इतकी नोंदवली गेली, तर उत्पन्न 1 कोटी 13 लाख 510 इतके नोंदवले गेले. पेंग्विनमुळे उद्यानाला ‘सुगीचे दिवस’ आले आहेत.

पालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय हे मुंबईकरांचेच नव्हे तर देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या ठिकाणी वाघ, हरीण, तरस, अस्वल, हत्ती, अजगर आणि शेकडो प्रकारचे पक्षी, झाडे आहेत. तसेच पाच मगरी आणि दोन सुसरीदेखील आहेत. या मगरी पाहण्यासाठी पर्यटक खिळून राहतात. या ठिकाणी शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती, फुलझाडे, जंगली झाडे आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेला यश

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात मार्च 2017मध्ये पेंग्विन आणल्यापासून पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. त्यामुळे याआधी दररोज 15 ते 20 हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न आता लाखांवर गेले आहे.

पर्यटकांची संख्या

जानेवारी    2,90,673

फेब्रुवारी     1,92,902

मार्च २,१३,१९८

एप्रिल         1,33,684

Comments are closed.