25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घ

कोल्हापूर : २५ लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यावसायिकाचे अपहरण करून काही तासांतच खून (Kolhapur Crime News) केल्याची घटना धक्कादायक घटना  घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या दानोळी गावातील ही धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना अटक (Kolhapur Crime News) केल्यानंतर  व्यावसायिकाला करंट देऊन मारल्याचे कबूल केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावात रात्री उशिरा घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मृत व्यक्ती भरतेश राजगोंडा टोपगोंडा असे असून, शेरी मळा परिसरातील शेतात ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.(Kolhapur Crime News)

Kolhapur Crime News: अपहरणकर्ते सतत ठिकाणे बदलतात

विशेष म्हणजे, अपहरणानंतर आरोपींनी तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती पुढे आली आहे. भरतेश यांना अज्ञातांनी जबरदस्तीने पळवून नेले. काही वेळानंतर त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला कॉल करण्यात आला. या कॉलमध्ये मोठी रक्कम घेऊन ठराविक ठिकाणी येण्याचा आदेश देण्यात आला. यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्याचे दोन मित्र सांगितलेल्या ठिकाणी गेले. मात्र, अपहरणकर्त्यांनी सतत लोकेशन बदलत त्यांना गोंधळात टाकले. काही वेळातच मोबाईल बंद करण्यात आला आणि संपर्क पूर्णपणे तुटला.(Kolhapur Crime News)

भरतेश्वर राजगोंडा टोपगोंडा (वय ४०) असे मृताचे नाव असून, खूनप्रकरणी दोघांना जयसिंगपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राजदीप अजय ताडे (२१), टिल्लू ऊर्फ मंथन राजेंद्र चंदुरे-पवार (२१, दोघे रा. दानोळी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी बॅटरीचा करंट देऊन भरतेश्वर यांचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले. या घटनेमुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime News:  मृतदेह उसाच्या शेतात सापडला

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, भरतेश्वर हे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घरी निघाले होते. याचवेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरूनच त्यांचे चुलत भाऊ महावीर टोपगोंडा यांना कॉल केला. भरतेश्वर हा फ्लॉवरचे २५ लाख रुपये देणे लागतो असे सांगून त्यांनी पैसे घेऊन देण्यास सांगितले. त्यावेळी महावीर यांनी तुमच्यातील व्यवहार समोर बसून मिटवूया, असे सांगताच संशयितांनी फोन बंद केला. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली होती. यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली होती. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतेश्वर यांची गाडी आणि चप्पल सापडली. त्यानंतर त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला. पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.