नेत्यांची डोकेदुखी वाढली! विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी, नाराजीनाट्
विद्रन परिषद निवडणूक 2025: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2025) जाहीर झाली आहे. 27 मार्चला विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. यात भाजपच्या (BJP) तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Faction) एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) एका आमदारासाठी ही निवडणूक पार पडणार आहे. भाजपने या निवडणुकीसाठी तीन नावांची घोषणा केली आहे. दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशींचं नाव भाजपकडून निश्चित करण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shiv Sena Shinde Faction) वाट्याला विधानपरिषदेची एक जागा असून इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे (मराठी) सावध पाऊले उचलण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतून ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी धुळे-नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांचं नाव आघाडीवर आहे. तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचे नाव चर्चेत असून सातत्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणारं नेतृत्व ही शीतल म्हात्रे यांची सध्याची ठळक ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे (Sanjay More) यांचं देखील नाव चर्चेत आहे. संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. संजय मोरे हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. तर नागपूरच्या किरण पांडव (Kiran Pandav) यांच्या नावाचीसुद्धा चर्चा सुरू आहे. किरण पांडव हे विदर्भातील एकनाथ शिंदे यांचे मजबूत शिलेदार आहे.
एकनाथ शिंदे सावध पाऊले उचलण्याची शक्यता
तर विधानपरिषदेसाठी शिवसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे सावध पाऊले उचलण्याची शक्यता आहे. आज नाव जाहीर झाल्यास होणारे नाराजी नाट्य टाळण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा ऐनवेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार थेट उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. आज नाव जाहीर करण्यात यावं, अशी पक्षातील नेत्यांची इच्छा आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता एकनाथ कोणत्या नेत्याला विधानपरिषदेसाठी संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=1wlnlrrs4li
अधिक पाहा..
Comments are closed.