कोकण विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटणार? तटकरे-शिंदेंच्या भेटीनंतर भरत गोगावलेंच्या वक्तव्

विधान परिषद निवडणूक 2026: कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) जागेवरून महायुतीतील (Mahayuti) दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच धुरंधर ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सुनील तटकरे आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर कोकणातील ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Vidhan Parishad Election 2026: तटकरे पिता-पुत्र उपमुख्यमंत्र्यांच्या दारी

कोकणातील ही जागा पुन्हा एकदा अनिकेत तटकरे यांनाच मिळावी यासाठी तटकरेंकडून जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू आहे. सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून जात आहे. या भेटीनंतर अनिकेत तटकरे यांची फेसबुक पोस्ट देखील कमालीची चर्चेत आली असून, त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांनी केलेला उठाव आता असफल ठरताना दिसत आहे.

Vidhan Parishad Election 2026: मंत्री भरत गोगावले यांचे सूचक विधान

शिवसेना या जागेवर विकास गोगावले यांच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड आग्रही होती. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी अत्यंत सूचक विधान केले आहे. राज्यात दोन जागा राष्ट्रवादीला मिळत असून पुणे आणि रायगडमधील जागा राष्ट्रवादीला गेल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मात्र या जागेबाबत आज निर्णय होईल, असे देखील भरत गोगावले म्हणाले आहेत. तर, शिवसेनेतील उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे आणि शिवसेनेत आम्ही या आदेशांचे पालन करतो, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Vidhan Parishad Election 2026: पालकमंत्रीपदावर तोडगा निघणार?

कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात शिवसेनेला रायगडचे पालकमंत्रीपद मिळणार का? यावरही आता चर्चा सुरू झाली आहे. भरत गोगावले यांनी यावर बोलताना, “रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आज तोडगा निघणार आहे,” असे सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे आता कोकण विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.