लेकासाठी सुनिल तटकरे मैदानात, थेट एकनाथ शिंदेंची घेतली भेट, अनिकेत तटकरेंची पोस्ट चर्चेत
Vidhanparishad Election : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत. अशातच राजकीय घडामोडींना वेग आला. कोकणातील जागेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय वातावरण तापल्यातं पाहायला मिळत आहे. ही जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे. तर राष्ट्रवादी देखील ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये सध्या जोरदार जुंपली
कोकणातील विधान परिषदेच्या जागेवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये सध्या जोरदार जुंपली असताना आता सुनील तटकरे आणि सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळं त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कोकणातील जागा अनिकेत तटकरे यांनाच मिळावी यासाठी तटकरे अनेक राजकीय डाव टाकत आहेत. त्यामुळे कोकणातील ही जागा अनिकेत तटकरे यांनाच मिळेल का या चर्चांना आता आल आहे. दुसरीकडे शिवसेना विकास गोगावलेंच्या माध्यमातून ही जागा लढवण्यासाठी आग्रही आहे आता नक्की या भेटीनंतर कोणाच्या पदरात ही जागा पडतेय हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. अनिकेत तटकरे आणि सुनील तटकरे यांच्या या भेटीदरम्याचे फोटो आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बरच काही सांगून जात आहे. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांचा उठाव असफल ठरतोय का हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे राहील.
पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय अनिकेत तटकरेंनी?
यावेळी साहेबांचे मार्गदर्शन लाभले तसेच आगामी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले. जनसेवा, संघटन बळकटीकरण आणि विकासाच्या ध्येयाने कार्य करण्यासाठी साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला पात्र ठरत जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
पूर्वीपासून कोकण हा शिवसेनेचा कणा : आमदार महेंद्र दळवी
पूर्वीपासून कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. त्यामुळं आम्ही ही जागा राष्ट्रवादीला का द्यावी? असा सवाल आमदार महेंद्र दळवी यांनी केला. कितीही झालं तरी ही जागा शिवसेनेला मिळेल आणि आम्ही जिंकू सुद्धा. सुनील तटकरे यांना स्वतःच्या पक्षात अस्तित्व टिकवणं मुश्किलीचे झालं असताना त्यांनी या जागेवर दावा करणे हे निंदनीय असल्याचे दळवी म्हणाले. काहीही झालं तरी शिवसेना ही जागा लढवणार आहे. मंत्री भरत गोगावले हे आमचे मार्गदर्शक आणि चार टर्मचे आमदार आहेत. पालकमंत्री पद हे भरत गोगावले यांना मिळालेच पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. राष्ट्रवादी उठावाचे काम आम्ही रायगड मधून केल्याचे दळवी म्हणाले. एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला कदापी ही जागा देणार नाही असे दळवी म्हणाले. पालकमंत्री पद तुम्हाला आणि विधानपरिषद आम्हाला अस कदापी होणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला जागा नाही, शिवसेना आमदार आक्रमक, तटकरेंवर हल्लाबोल
आणखी वाचा
Comments are closed.