कोकणातील माझ्याच नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी केला, महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट

Vidhanparishad Election : राज्यातील विधान परिषद (Vidhan parishad) निवडणुकांमध्ये रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. कारण, येथील मतदारसंघात भाजप महायुतीमध्ये असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडण्यात आली असून सुनिल तटकरेंचे पुत्र अनिकेत तटकरेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मात्र, येथून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनंतर जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यानंतर आमदार महेंद्र दळवी यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

आमदार महेंद्र दळवी यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज  मागे घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. दळवी यांच्या पोस्टमुळं कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. माझा संघर्ष कुणा व्यक्ती विरोधात नव्हता तर कोकणच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी होता  असं मजकुरात त्यांनी स्पष्ट केलं आहे. माझ्या राजकीय प्रवासात एका राजकीय पर्वाचा अंत मी स्वतः केला होता. आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचा अंत झाला असता. पण कोकणातील माझ्याच काही नेत्यांनी माझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाचा मान राखत आणि पक्ष शिस्तीला प्राधान्य देत अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असं दळवी यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. दळवी यांच्या पोस्ट मुळे कोकणात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस अद्याप कायम असल्याचं समोर आलं आहे. आजचा दिवस कोकणवासियांचा साठी नसला तरी उद्याचा येणार सुर्योदय माझ्या कोकणवासियांसाठी नक्की असे असं पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला असलेला शिवसेना महायुतीचा विरोध मावळला

कोकण विधान परिषद निवडणुकीतून महेंद्र दळवी यांच्या कन्या आणि अपक्ष उमेदवार असलेल्या जुईने दळवी यांनी अखेर त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावेळी, भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हेही हजर होते. जुईली यांच्यावतीने विघ्नेश माळी हे सूचक होते, त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला. जुईलींची तब्येत ठीक नसल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत, असं विकास गोगावले यांनी सांगितलं. तर, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत विचारले असता, याबाबत मुख्यमंत्री आणि आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे विकास गोगावले यांनी म्हटले. मात्र, एकनाथ शिंदे यांचा आज रायगड दौरा असून, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच जुईली दळवी यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे, येथील मतदारसंघात अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला असलेला शिवसेना महायुतीचा विरोध मावळल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा

Comments are closed.