राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची फोनवरुन चर्चा; विधानपरिषदेसाठी मुंबईतल्या नावावर शिक्कामोर्तब?

विधानपरिषद निवडणूक : विधानपरिषदेच्या (विधानपरिषद) निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आलं आहे. अद्याप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली नाहीत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. चर्चेत माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचं नाव आघाडीवर

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची फोनवरनाही चर्चा झाली आहे. यामध्ये विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. चर्चेत माजी आमदार jअभिमान सीदादीच्या यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाकडून आजच उमेदवार जाहीर केल जाईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

श्रीनिवास बिक्कड यांनी काँग्रेस मुख्यालयातून ए फॉर्म घेतला

विधान परिषद निवडणुकीसाठी कअँकृपा पक्षातर्फे फॉर्म दिला आहे. ए फॉर्म मुंबईत पाठवण्याची जबाबदारी श्रीनिवास बिक्कड यांच्यावर देण्यात आली आहे. बिक्कड यांनी कअँग्रेस मुख्यालयातून फॉर्म घेतला. श्रीनिवास बिक्कड फॉर्म घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबईतच प्रदेशाध्यक्ष त्यांना बी फॉर्म देणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026). विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 6, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे.

महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 9 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)

भाजपकडून विधानपरिषदेसाठी 6 उमेदवारांची यादी

दरम्यान, कालच भाजपने विधानपरिषदेसाठी 6 उमेदवारांची यादी जाहीर केली.  भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. तर, विधानपरिषदेच्या एका पोटनिवडणुकीसाठी एक म्हणजेच एकूण 6 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपचे उमेदवार

सुनील कर्जतकर,
माधवी नाईक,
संजय भेंडे,
विवेक कोल्हे
प्रमोद जठार
प्रज्ञा सावंत

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026

आणखी वाचा

Comments are closed.