…मग सारथी, बार्टी अन् महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल


विजय वाडेटीवार: महायुती (Mahayuti) सरकारने सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला, मग सारथी, बार्टी, महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी? असा प्रश्न काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. जर ओबीसींच्या पीएफ आणिडी (P.hd) विद्यार्थ्यांना निधी देताना सारथी (Sarathi), बार्टीला (Barti) दिली. मात्र महाज्यतीची (Mahajyoti) फाईल पडून आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय केलं? वित्तमंत्री सारथीला देताना चूक झाली असे म्हणत असतील तर ती चूक त्यांनी महाज्यातीला निधी देऊन पुन्हा करावी. या ओबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली तेव्हापासून द्यायला हवं होतं. त्या विद्यार्थ्यांनी वैतागून पत्र लिहिलं आहे. मी देखील पत्र लिहिले आहे. ओबीसींच्या विद्यार्थ्यासदर्भात सरकारची काय भूमिका आहे, हे एकदा सांगून द्यावी, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले?

Vijay Wadettiwar On Mahayuti : सारथीची फाइव स्टार हॉटेल सारखी इमारत, ओबीसीच्या महाज्योतीचा पत्ता नाही

दरम्यानअण्णासाहेब पाटील महामंडळाला 13000 कोटीचा करत आहात. इकडे ओबीसी महामंडळाला 500 कोटी देत नाही. कोल्हापूर, पुणे येथे सारथीची फाइव स्टार हॉटेल सारखी इमारत बांधली. ओबीसीच्या महाज्योतीचा पत्ता नाही. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं, अशी आमची मागणी आहे. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले?

Vijay Wadettiwar On Raj Thackeray Uddhav Thackeray: ….तर आमच्यासाठी आनंद आहे

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले. स्नेहभोजनासाठी ही भेट झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये तब्बल पावणे तीन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान या मुद्दयांवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले तेदोन भाऊ आणि कुटुंब एकत्र येत आहे याचा आनंद आहे. दोन भाऊ वेगळे रहावे, हे भाजपच्या डोळ्यात खुपत असेल. दोन भाऊ एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेत असेल तर आमच्यासाठी आनंद आहे. आम्ही एकत्र येण्यासंदर्भात तो निर्णय पाहू. असेही ते म्हणाले?

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.