मी पण क्षत्रीय, घोडा लावतो म्हणणाऱ्या स्ट्रीट डॉगचं खपवून घेणार नाही, विजयसिंह पंडितांचा हाकेंव

बीड : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार विजयसिंह पंडित आणि मनोज जरांगे यांच्यातील मतभेद उघडपणे दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि त्यांचे बॅनर लावले, यावरून हाकेंनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर परस्परांना खालच्या शब्दांत उपमा दिल्याने हा वाद अधिकच तीव्र झाला असून, हाकेंनी थेट पंडित आणि जरांगेंवर हल्लाबोल केला. त्यावरती आता विजयसिंह पंडित यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्यावर एकदम खालच्या पद्धतीने वक्तव्य

एबीपी माझाशी बोलताना  विजयसिंह पंडित म्हणाले, तीन दिवसांपासून हे महाशय बीड जिल्ह्यामध्ये येऊन तिथलं वातावरण कलुशीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन दिवसापूर्वी आले आणि एक बैठक घेतली, बैठक घेऊन त्यामध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलं. जे राज्य विधिमंडळाचे सदस्य आहेत. संविधानिक पदावर आहेत, मी असेन किंवा माजलगावचे आमदार जे चार-पाच टर्म आमदार आहेत, प्रकाश सोळंके आमच्यावर एकदम खालच्या पद्धतीने वक्तव्य त्या ठिकाणी केली गेली. माझ्या बाबतीत तर बॅनर लावले आणि याला आम्ही पाहून घेऊ, दंडुक्याने मारू अशा पद्धतीची वक्तव्य केली गेली. चितावणीखोर असं डोक्यात ठेवून तिथे ते तीन चार दिवसापासून हे करत आहेत. त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया मी दिली नाही. सहाजिक आहे माझ्या भागामध्ये माझ्या मतदारसंघांमध्ये येऊन असं जर कोणी बोलत असेल तर शेवटी मी त्या भागाचा प्रतिनिधित्व करतो. त्याच्या प्रत्येक क्रियेला मी प्रतिक्रिया देणार, माझे सहकारी यांना मी सांगितलं होतं. त्याला काही बोलू नका. तो असाच वागतो. त्याला फक्त लाईमलाईट मध्ये यायचं आहे, त्याला फक्त प्रकाशझोतात यायचा आहे. याचं कर्तुत्व काहीच नाही. हा सांगतो, की मी ओबीसीच प्रतिनिधित्व करतो, पण त्याचा चार दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ आपण पाहिला, त्याची काय नियत आहे, त्याच्या डोक्यात काय आहे, ते व्हिडिओच्या माध्यमातून कळलं. त्याला ओबीसीचा नेतृत्व करतोय हे चित्र निर्माण करायचा आहे. पण तो ओबीसी समाजाचा नेता नाही. त्याला ओबीसी समाजाचा नेता म्हणता येणार नाही. त्याच्या नावावर समाज बांधवांच्या नावावर आपल्याला काय साध्य करता येईल तुम्ही पाहिला असेल. मागच्या वेळेला मला राज्याचा मंत्री केलं पाहिजे असं हास्यास्पद विधान त्यांनी केलं होतं. त्याच्या डोक्यात दुसरं काही नाही. फक्त राजकीय हेतूने त्याने हे चालू केलं आहे. त्याने सगळं वातावरण निर्माण केलं आणि त्याची अशी प्रतिक्रिया उमटली. त्याच्या वक्तव्याचा आणि प्रतिक्रियेचा आमच्या लोकांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर भरपूर गोष्टी झाल्या, त्याच्या पुतळ्याचे दहन केले गेले, मला माहिती नाही, मी तिथे माझ्या भागत नव्हतो, मी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती, तीन दिवस, त्यांनी अतिशय खालच्या भाषेत माझ्यावर टीका केली होती, असंही विजयसिंह पंडित यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

चितावणीखोर वक्तव्य तुम्ही एकदा पाहा…

मी जे काही श्वान आणि बाकी प्रतिक्रिया दिली, ती सकाळची प्रतिक्रिया आहे. शेवटी याचं कितीपर्यंत सहन करायचं. हा कोण आहे. हा मोकाट फिरतो आणि सगळ्यांवर टीका करतो. एकेरी भाषेत बोलतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतो. अर्वाच्य भाषेत बोलतो, मी त्याच्यावर टीका केली ती सकाळची आहे. त्याच्या आधीच्या वक्तव्यावर मी काहीच बोललो नव्हतो. त्याची चितावणीखोर वक्तव्य तुम्ही एकदा पाहा. माझा पुतळा तू का जाळतो? मला मी कशाला जाळू. मी एका संविधानिक पदावर आहे. मी हे सगळं का करू. मी काल बीडवरून निघालो, मी कशाला काय करू, त्याच्या क्रियेला प्रतिक्रिया आली, त्यावर आज सकाळी म्हणत आहे, मी तिथे येतो, तुला दाखवतो, तुझ्या दम असेल तर तिथे ये. घोडा लावतो. मी असं करतो, तसं करतो, मी पण क्षत्रिय आहे, मी काय साधासुधा आहे का, त्याच्यावरती मी सांगतो मी या गोष्टींचे समर्थन करत नाही, मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना समर्थकांना आवाहन करतो, त्याचे हे कुटील कारस्थान आहे, षडयंत्र आहे, जे काही गरजवंत मराठा मराठा समाजाचा न्याय मागण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन होत आहे, ते सनदशीर मार्गाने होत आहे. शांततेत होत आहे. अखंड महाराष्ट्र मधून जे मराठा बांधव मुंबईला येणार आहेत, ते सगळं कसं रोखता येईल याच्यात कशी आडकाठी घालता येईल, यामुळे वातावरण आणखी कस चिघळेल, असं षडयंत्र त्याचा आहे. त्यामुळे असं काही करू नका असे मी सगळ्यांना फोनवरून सांगतोय असंही त्यांनी म्हटलं आहे.

तो काट्या घेऊन आला होता, दंड थोपटत होता

मी जर सांगितलं असतं, तर तो बीड जिल्ह्याच्या हद्दीत देखील येऊ शकला नसता. इथून तो मोकळा गेला नसता. पण माझं ते काम नाही मी सांगितलं मी एका संविधानिक पदावर आहे. मी कोणत्या गोष्टींचं समर्थन करत नाही. तो काट्या घेऊन आला होता, दंड थोपटत होता तिथे त्याने लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला. माध्यमांवरती दिसलेला आहे. त्यानंतर माझे लोक का गप्प बसतील? असंही पुढं विजयसिंह पंडित यांनी म्हटलं आहे.

बीड जिल्हा हा चुकीच्या गोष्टींसाठी राज्यभरामध्ये चर्चेत

त्यांच्या आव्हानावरती बोलताना पंडित म्हणाले, हा श्वान आहे. हा जातीवंत श्वान नाही, हा स्ट्रीट डॉग आहे, तशातला हा श्वान आहे. अशाच पद्धतीने वातावरण बिघडण्याचं काम तो करतोय. मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. मला येऊन म्हणतो मी पाचशे किलोमीटरवरून आलो तू ये, मला काही गोष्टींची पथ्य पाळावी लागतात. आज बीड जिल्हा हा चुकीच्या गोष्टींसाठी राज्यभरामध्ये त्याचं नाव होतंय. त्याची प्रतिमा डागाळली गेली आहे. त्यापुढे जाऊन आज राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बीडचा पालकत्व स्वीकारलं ते पालकमंत्री आहेत. त्यांच्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी या सगळ्या गोष्टी सहन केल्या. पण या पद्धतीने काळ जर सोकावत असेल तर त्याला पायबंद लावण्याचे आणि त्याला लगाम लावण्याची ताकद सुद्धा माझ्यामध्ये आहे वेळ आणि काळ बघून घेईल असेही पुढे पंडित यांनी म्हटलं आहे.

काहीतरी डोक्यात षडयंत्र घेऊन काम करणारी ही अपपवृति आहे. बॅनर लावले म्हणजे काय केलं, त्यामध्ये मी काय भडकवलेलं होतं का? माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने मोठे मोठे बॅनर लावले. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ते बॅनर लावले होते. त्याच्यावर काहीही आक्षेपार्ह लावलं नव्हतं, त्यावरती लक्ष्मण हाके तिथे येऊन असं म्हणत होते असंही पुढे पंडित यांनी म्हटलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=vm6y5d6gkj8

आणखी वाचा

Comments are closed.