बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना मतदान करा, शरद पवार यांचे आवाहन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. बारामतीमधील मतदारांनी सुनेत्रा पवार यांना मतदान करून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केले आहे.

मी 1967 मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनामुळे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. पण, प्रकृती बिघडल्याने मतदानास जाणार नसल्याचे स्पष्ट करत शरद पवार यांनी पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात, मतदानाला जाणार नाही

शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत मतदानासाठी जाणार नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

Comments are closed.