कलिंगड खाताना कोणती काळजी घ्यायची?; डॉ. रवि गोडसे म्हणाले, एक तुकडा…
टरबूज मृत्यू प्रकरण मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा कलिंगड खाऊन संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) घडली होती. मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात मृतांच्या शरीरात “पेनकिलर-सदृश” (वेदनाशामकासारखा) पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टेमदरम्यान हा संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. सदर प्रकरणावर डॉक्टर रवि गोडसे यांनी लोकमत हिंदीशी बोलताना एक महत्वाची माहिती दिली आहे. (Doctor Ravi Godse On Watermelon Death Case)
चिकन जास्त वेळ आपण शिजवतो. त्यामुळे चिकनमुळे विषबादा होण्याची शक्यता कमी असते. फळं लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी धोकादायक रसायने आयोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकतात. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते, असं रवि गोडसे म्हणाले. तसेच कलिंगड स्वच्छ धूवून घ्या…कलिंगड कापताना सूरी धूवून घ्या…कलिंगड कापल्यानंतर जास्तवेळ ठेऊ नका. एका दिवसात कापलेलं कलिंगड खाऊन टाका, असा सल्ला डॉक्टर रवि गोडसे यांनी दिला. तसेच कलिंगड लाल दिसण्यासाठी काहीजण रंगांचा वापर करतात. त्यामुळे कलिंगडचा एक तुकडा कापून पाण्यात टाका, रंग निघतो का तपासून घ्या…असं रवि गोडसे यांनी सांगितले. (Doctor Ravi Godse On Watermelon Death Case)
अन्न व औषध प्रशासनने स्वतंत्र तपास केला सुरू- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (FDA) ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यात बिर्याणी, कलिंगड (टरबूज), माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. अन्न निरीक्षकांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन केले जप्त- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोनही जप्त केले असून कोणतेही संशयास्पद संपर्क होते का, याची चौकशी सुरू आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबत आणि बँक व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय? (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या:
खालील आरोग्य साधने पहा-
तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजा
वय कॅल्क्युलेटरद्वारे वयाची गणना करा
आणखी वाचा
Comments are closed.