कलिंगड खाऊन कुटुंब संपलं, फॉरेन्सिक चाचणीत चक्रावणारी माहिती, शरीरात मोर्फिन, अवयव हिरवट; डॉक्ट
टरबूज मृत्यू प्रकरण मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील (Dokadia Family Pydhonie) चारही सदस्यांचा कलिंगड खाऊन संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना (Watermelon Death Mumbai) घडली होती. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृतांचे महत्वाचे अवयव हिरवट पडल्याचे प्राथमिक फॉरेन्सिक चाचणीत समोर आले आहे. मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली आहे. तज्ञांच्या मते सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी आहे. त्यामुळे विषबाधेची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. असे बदल जेव्हा एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये दिसतात, तेव्हा एखाद्या विषारी घटकाचा शरीरभर पसरतो. त्यामुळे नवीन खुलास्यामुळे चौघांच्या मृत्यूला घेऊन संशय आणखीन बळावला आहे. तर अब्दुल्ला यांच्या शरीरात मोर्फिन देखील आढळली असल्याची माहिती समोर आली आहे. (Watermelon Death Case Mumbai)
अन्न व औषध प्रशासनने स्वतंत्र तपास केला सुरू- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (FDA) ने स्वतंत्र तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यात बिर्याणी, कलिंगड (टरबूज), माठातील व फ्रिजमधील पाणी, कच्चा व शिजवलेला भात, कच्चे व शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाले यांचा समावेश आहे. अन्न निरीक्षकांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोन केले जप्त- (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
पोलिसांनी मृतांचे मोबाईल फोनही जप्त केले असून कोणतेही संशयास्पद संपर्क होते का, याची चौकशी सुरू आहे. तसेच कुटुंबप्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांच्या व्यावसायिक व्यवहारांबाबत आणि बँक व्यवहारांबाबतही तपास सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय? (Watermelon Death Mumbai Pydhonie Family)
डोकाडिया कुटुंबीयांनी 25 एप्रिल रोजी रात्री कलिंगड खाल्ले. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांनाही उलट्या, चक्कर आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर 26 एप्रिलला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. डोकाडिया यांच्या दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत आढळल्या. यानंतर चौघांनाही तात्काळ जेजे रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर एका मुलीला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर काही तासांनी दुसऱ्या मुलीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर काही वेळात पालकांचाही मृत्यू झाला. सदर घटनेमुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.