निवडणूक आयोगाला आम्ही महत्त्वाचे पुरावे दिले; आम्ही अनंत चुका दाखवल्या, पत्ते अपूर्ण, घराच्या च


मुंबई: मुंबईत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १५ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी, (Mahavikas aghadi) मनसे (MNS) आणि इतर विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत पुन्हा बैठक झाली. बैठकीत पक्षांनी निवडणूक प्रक्रियेतील शंका, मतदार यादीतील त्रुटी व निवडणुकीच्या पारदर्शकतेसंबंधी मुद्दे उपस्थित केले.

MVA AND MNS Meeting : भेटीनंतर पार पडली पत्रकार परिषद

या बैठकीत प्रमुख उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे (शिवसेना), राज ठाकरे (मनसे), जयंत पाटील (काँग्रेस), जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई आणि अजित नवले यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने निवडणूक आयोगासमोर मतदारांची अचूक नोंद, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली. विरोधकांचे मत आहे की, मतदार यादीतील चुका, प्रक्रियेतील विलंब किंवा प्रशासनाच्या निर्णयांमुळे निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो. या बैठकीनंतर पुन्हा या सर्व नेत्यांची एक बैठक पार पडली त्यानंतर आता पत्रकार परिषद पार पडली, यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बैठकीतील माहिती दिली.

Jayant Patil : त्यांना आम्ही अनंत चुका दाखवल्या

जयंत पाटील म्हणाले, काल आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यावेळी त्यांना आम्ही अनंत चुका दाखवल्या. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं सगळं म्हणणं आम्ही पाठवतो. या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करतो. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग आहे. त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं काही सुचवल्यामुळे आज त्याबाबतच्या प्रश्न राहिल्याने आम्ही त्यांची भेट घेतली. कालच्याप्रमाणे आजही सर्व विरोधी पक्ष नेते तिथे गेले. काही महत्त्वाचे पुरावे आम्ही तिथे दाखवले आणि त्या पुराव्यांच्या सहित आम्ही आज त्यांना आम्ही काही माहिती दिली. आम्ही त्यांना पत्र ही दिलेले आहे. पत्र देत असताना मतदार यादीतील मतदारांचे मोठ्या प्रमाणावर पत्ते अपूर्ण आहेत. काही प्रमाणे चुकीचे टाकलेले आहेत. त्याचबरोबर मतदार यादीत असलेल्या पत्त्यावर तो मतदार राहत नाही. त्यातील काही उदाहरणे त्यांना दिली. त्यामध्ये मुरबाड मतदार संघामध्ये बूथ क्रमांक आठमध्ये पारशी मतदारांचा एक घर आहे, तिथे चारशे मतदार आहेत. त्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, अनेक घराच्या चुकीच्या नोंदी आहेत किंवा चुकीचे पत्ते दिलेले आहेत.

Jayant Patil : महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सर्वेर दुसरं कोणी तरी चालवतो

वडनेरामध्ये, कामटीमध्ये घरक्रमांकचं नाही, बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार आहे. एपीक नंबर एकच असतो मात्र मतदार यादीत अनेक असल्याचे निदर्शनास आणून दिले. नालासोपारामध्ये सुषमा गुप्ता महिलेचे नाव ६ वेळा नोंदवले आहे. १२ ऑगस्टला आमच्या कार्यकर्तयाने दुपारी दाखवलं. ६ वाजता मतदानानंतर त्या महिलेचे नाव काढलं होतं. आपण एक चॅनेलमधून बातमी दाखवतो. दुपारी ३ ला ती नावं असतात ६ वा नावं काढतात. निवडणूक आयोगाला आम्ही विचारलं, ही नावं कोणाच्या सांगण्यावर काढली. तक्रार कोणी केली. महाराष्ट्र निवडणूक आयोगाचा सर्वेर दुसरं कोणी तरी चालवतो. राज्य किंवा केंद्राच्या हातात ही यंत्रणा नसून बाहेरूनच कोणी तरी हे चालवतं आहे असा आमचा विश्वास बसला असल्याचंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

Jayant Patil : त्वरीत कारवाई सुरू करा अशी आमची मागणी

त्याचबरोबर पुण्यात ८६९ मतदारांची नोंद आहे. दर तासाला मतदार यादी जाहिर होते, कोणी कुठे किती मतदान केलं. विधानसभेला हे सिस्टम तोडलं. थेट दुसऱ्या- तिसऱ्या दिवशी जाहिर केलं. आम्ही विधानसभेला याद्या वाचल्या. हेच स्थानिक स्वराज्य संस्था निवणूकीत चालू राहिलं तर कठीण आहे. मुदत वाढवून चालणार नाही. मतदार याद्या तपासा. बोगस मतदार काढून टाका. जाहीरपणे  एक खासदार सांगतात २० हजार बाहेरून मतदार आणल्याने माझा विजय झाला याची नोंद घ्या आणि त्वरीत कारवाई सुरू करा अशी आमची मागणी आहे, असंही पुढे जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील: मतदारांची प्रायव्सीचं कारण देत माहिती दिलेली नाही

पुढे जयंत पाटील म्हणाले, १२ तारखेला आम्ही हे पत्र दिलं त्याची दखल घेतली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगालाही दिली, सोईचे ठेवतात गैरसोईचे काढत आहेत. हे सर्व कुणीतर माॅनटर करत असल्याचं निदर्शनास आलं. पण तक्रार केली, तर दखल नाहीच. आता हे चालणार नाही. असं करून निवडणूका वेगळ्या दिशेने नेल्या जातात. सुषमा गुप्ता नालासोपारा दुपारी नाव होतं. ६ वा काढलं होतं. याची चौकशी नाही. मुरबाड मतदारांच्या घरापुढे डॅश – आहे असे ४०० लोकं आहे. पुण्यात ८७९ लोकं आहेत. नाशिकमध्ये ३ हजार ८२९ घरात ८१३ लोकं दाखवलेले आहेत. हे पुरावे आहेत हवेत बोलत नाही. अशोक पवार शिरूर गावात काही प्रश्न उपस्थित केले. घर क्रमांक १ मध्ये ८८८ लोकं दाखवलेत. लेखी तक्रार केल्यावर मतदारांची प्रायव्सीचं कारण देत माहिती दिलेली नाही. ही महिती गोपनिय असल्याचे सांगत माहिती दिलेली नाही. कायदा आहे ३२ नंबरचा कोणी कुठलाही पुरावा मागितला तर तो ती महिती कोणत्या आधारवर नोंदवलं हे द्यावे लागेल, आम्हीच कायदे सांगतोय, असंही जयंत पाटील म्हणालेत.

https://www.youtube.com/watch?v=PW5FX92ECWI

आणखी वाचा

Comments are closed.