‘आज आम्हाला तुमची गरज’, मनोज जरांगेंनी मराठा नेत्यांना घातली साद, म्हणाले, ‘एकनाथ शिंदेंना बो
मुंबई : मराठा आरक्षणासाठीचा लढा पुन्हा पेटला असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवली सराटी येथून मुंबईकडे कूच केली आहे. त्यांच्यासोबत अनेक जण मुंबईकडे रवाना झाले आहे. आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा मार्ग निवडला आहे. तर काल मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना आरोप केला होता की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आरक्षणाचं काम करू दिलं नाही, त्यानंतर आज माध्यमांच्या प्रश्वावरती उत्तर देताना एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणावर बोलू देत नाहीत असा मोठा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला आहे.
मी घेतलेल्या निर्णयावर ठाम आहे, मी मुंबईकडे निघालो आहे, देवदेवाच्या आड लपायचं आणि हिंदू लोकांच्या आड लपायचं, याच्याबाबत कोण बोलत नाही, पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही त्यांना जन्मभर विसरणार नाही, नाही सहकार्य केलं तर कमीत कमी तो समाजासमोर उघडा पडेल. त्यांचे नेते एकजुटीने लढत आहेत. आता यांनाच काय झालंय, आता आम्हाला गरज आहे. राजकीय पक्षातील मराठे, सत्ताधारी, विरोधक आणि श्रीमंत मराठे यांची आम्हाला गरज आहे, असंही जरांगेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
जरांगे सातत्याने म्हणत आहेत, देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत आहेत, त्यामुळे ते बोलत नाहीत का? यावर जरांगे म्हणाले, किती दिवस सगळं सहन करतील, सत्ताधारी आणि विरोधातील मराठा आमदारांना आवाहन केलं आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या, आज समाजाला तुमची गरज आहे, समाज तुमच्या सोबत आहे, तुम्ही समाजासोबत राहा, कशालाही घाबरू नका सोबत या साथ द्या, असंही जरांगेंनी सत्तेतील आणि विरोधातील नेत्यांना, आमदारांना आवाहन केलं आहे, दरम्यान पत्रकाराच्या एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती, तेही आता मराठा आरक्षावरती बोलत नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना बोलू दिलं जात नाही”.
मराठा समाजातील सदस्य पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन मुंबईकडे
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू राहिलेल्या बीड जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलनासाठी पाठिंबा वाढतो आहे. मुंबईकडे जाण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत आणि त्यांच्यासोबत जाण्यासाठी बीडमधून मोठ्या संख्येने मराठा समाज अंतरवली सराटीच्या दिशेने निघाला आहे. ट्रकच्या ट्रक भरून मराठा समाजातील सदस्य पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन मुंबईकडे निघत आहेत. एक ना अनेक ट्रक अशा स्वरूपात अंतरवलीकडे रवाना होत आहेत.
माजलगाव मधून बाराशे गाड्या
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या माजलगाव तालुक्यातून बाराशे गाड्या अंतरवलीकडे रवाना झाल्या आहेत. समाज बांधवांनी वर्गणी करून या सर्व गाड्यांची व्यवस्था केली असून हजारो मराठा समाज बांधव हे या वाहनांमधून अंतरवलीपासून जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. इतकंच नाही तर पुढील पंधरा दिवस पुरेल इतकी जेवणाची व्यवस्था ही त्यांनी केल्याचे यावेळी मराठा बांधवांकडून सांगण्यात आले.
https://www.youtube.com/watch?v=bmzko-brspi
आणखी वाचा
Comments are closed.