सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, 20 जूनला रेवती सुळे-सारंग लखानी लग्नाच्या बेड

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. रेवती सुळे आणि नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानी यांचा शुभविवाह २० जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. (Revati Sule Marriage With Sarang Arun Lakhani)

मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईतील एका नामांकित ठिकाणी अत्यंत शाही थाटात पार पडणार आहे. या लग्नासाठी पवार कुटुंबीय आणि लखानी कुटुंबाकडून जय्यत तयारी सुरू असून, महाराष्ट्रासह देशातील अनेक दिग्गज राजकीय नेते, उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Revati Sule Marriage With Sarang Arun Lakhani)

केवळ विवाहसोहळाच नव्हे, तर लग्नानंतरचे रिसेप्शन (स्वागत सोहळा) देखील अत्यंत भव्य असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मुंबईत पहिला स्वागत सोहळा होईल. वरपक्ष नागपूरचा असल्याने तिथेही एका विशेष रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान लक्षात घेता, दिल्लीतही एक भव्य रिसेप्शन पार पडणार आहे. (Revati Sule Marriage With Sarang Arun Lakhani)

सारंग अरुण लखानी नागपूरचे

सारंग अरुण लखानी नागपूरचे आहेत. त्यामुळे रेवती सुळे नागपूरची सून होणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्रमुख्यमंत्र्यांना त्रास होतो देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची सूत्रांचे माहिती आहे. (Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani)

सुप्रिया सुळेंचा होणारे जावई सारंग लखानी कोण आहेत?

सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग अरुण लखानी हे विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. सारंग अरुण लखानी हे एक चांगले बॅडमिंटनपटूही आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

(रेवती सुळे यांचा सारंग अरुण लखानीसोबत विवाह)

कोण आहेत रेवती सुळे?

सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे हिने प्रतिष्ठित London School of Economics मधून पदवी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत रेवती सुळे यांनी प्रथमच आपल्या आई सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. (Revati Sule Marriage Sarang Arun Lakhani)

आणखी वाचा

Comments are closed.