ठाकरेंनी नाव जाहीर करताच, आधी तयारी, मग माघार; विधानपरिषद उमेदवारीवरुन काय घडलं? हर्षवर्धन सपका

मुंबई : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने (Congress) उमेदवार न दिल्याने किंवा इतर कुठल्याही पक्षाने दहावा उमेदवार न दिल्याने अखेर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यासाठी, AB फॉर्म देखील दिल्लीतून पाठवला होता. मात्र, अखेर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav thackeray) दिल्लीत हायकमांडशी फोनवरून बोलणं केल्यानंतर ही कोंडी सुटली आणि काँग्रेसने माघार घेतली. या घडामोडींवेळी नेमकं काय घडलं  उद्धव ठाकरे यांना पाठिंबा होता मात्र अंबादास दानवेंचे नाव समोर आल्यानंतर उमेदवार देण्याच्या चर्चा होत्या, याबाबच आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. महाराष्ट्रआचा 67 किंवा वर्धापन दिन…यानिमित्त एबीपी माझानं आज माझा व्हिजन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी या सर्व घडामोडींसह विविध मुद्यांवर भाष्य केलं.

Harshwardhan Sapkal Majha Vision 2026 :  त्यांनी त्यांच्या अधिकारांमध्ये एक नाव जाहीर केलं

या कार्यक्रमाेळी विधान परिषदेच्या बाबत तुमचं आधीपासून असं मत होतं की, उद्धव ठाकरे चालतील पण मग अंबादास दानवे का नाही किंवा त्यांचा दुसरा उमेदवार का नाही, आमच्यापर्यंत बातम्या येत होत्या त्या होत्या समन्वयाच्या अभावाच्या नक्की काय झालं ते जाणून घ्यायचं आहे, यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, या सर्व चर्चेची सुरुवात आहे, ती राज्यसभेच्या वेळी झाली, राज्यसभेच्या वेळेस आमची भूमिका होती की, केंद्रामध्ये काँग्रेस हा प्रभावी पक्ष आहे. राष्ट्रीय स्तरावरती आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे,ते राज्यसभेत विरोधी पक्ष नेते देखील आहेत, त्या ठिकाणचा अधिकच संख्याबळ आम्हाला मिळावं या अनुषंगाने राज्यसभेमध्ये काँग्रेसला पाठवावं आणि महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी आहेत, त्यांनी विधान परिषदेत जावं अशा स्वरूपाचा आमचा प्रस्ताव होता, या प्रस्तावामध्ये राज्यसभेला शरद पवार यांचं नाव पुढे आलं, त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय होत असताना, आमच्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, यांच्या पातळीवरती यासंदर्भातला निर्णय बदलण्यात आला, मात्र महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं आणि ते जर जात नसतील तर एकदा सर्वसमावेशक आणि सर्व गोष्टींची चर्चा व्हावी कारण आम्ही पण एक राजकीय पक्ष आहोत आमचेही अधिक नेते आहेत, पुढे राज्यसभा आहे विधानपरिषद आहे, किंबहुना 2029 सालची लोकसभा आणि विधानसभा देखील आहे, या सर्वाच्या संदर्भातमध्ये याबाबत चर्चा झाली पाहिजे, आणि पुढे नेमकं आपल्याला कसं लढलं पाहिजे साधक बाधक स्वरूपाची चर्चा झाली पाहिजे आणि ही चर्चा होऊन जो निर्णय होईल तो स्वीकारला जाईल, यामध्ये आम्ही त्यांना विधानपरिषदेवर जावं असं म्हणत होतो, उद्धव ठाकरेंच्या संदर्भात जो प्रस्ताव होता, तो त्यांनी स्वीकारला त्यावर त्यांनी विचार करणार असल्याचेही सांगितलं. मात्र, कुठल्याही प्रकारची चर्चा न होता किंवा आगामी काळामध्ये इंडिया अलाईन्स आणि महाविकास आघाडी कशी राहील, नेमकं काय कसं, पुढे गेलं पाहिजे, याची चर्चा न होता, त्यांनी त्यांच्या अधिकारांमध्ये एक नाव जाहीर केलं, ते नाव जाहीर करत असताना सामाजिक स्वरूपात एक आश्चर्य व्यक्त होणं स्वाभाविक होतं, चर्चा होणे आवश्यक आहे, पुढच्या गोष्टी होत्या, एकदा का सगळ्या गोष्टी ठरल्या की पुढे जाण्यात क्लॅरिटी येणं महत्त्वाचं आहे, असंही सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal Majha Vision 2026 :  आज अडीच ते तीन तास या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली बैठक झाली

तर ठाकरेंनी नाव कळवायला हवं होतं का? चर्चा करायला हवी होती का? यावर बोलताना सपकाळ म्हणाले, कळवण्याच्या किंवा सांगण्याच्या आधी बसून राष्ट्रीय स्तरावरून ज्या सूचना मित्रपक्ष या नात्याने होत्या, जी आमच्याकडूनही एका अपेक्षा होती, ती पुढे बसून एकत्र या गोष्टी ठरल्या पाहिजेत, दरवेळी नवा गडी नवा राज्य, प्रत्येक वेळेस काय आलं तर चर्चा करणे हे सगळे एकदाच ठरवून, या गोष्टी न झाल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा जो निर्णय होता तो अमान्य आहे असं नाही पण, तो मान्य करायचा तर कसा करायचा ही अटकळ त्यामध्ये होती, त्यासंदर्भात पुढच्या ज्या गोष्टी ठराव्या ही आमची भूमिका होती, त्यातून कुठेतरी भांड्याला भांडण लागणार हा प्रकार जरी वाटत असला तरी हा एक संवादाचा अभाव होता आणि आज अडीच ते तीन तास या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली बैठक झाली, त्यातून आमचं सगळं अंडरस्टँडिंग झालं आणि काँग्रेस पक्ष आगामी काळामध्ये प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल ही एकंदरीत भूमिका आमची ठरली आणि सर्वांनी मिळून भाजपच्या विरोधात लढलं पाहिजे हा आमचा सर्वांचा समान दुवा, समान धागा आहे, तो देखील आम्ही अबाधित स्वरूपात ठेवला आहे, असंही पुढे हर्षवर्धन सपकाळ यांना म्हटलं आहे.

Harshwardhan Sapkal Majha Vision 2026 : बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय का घेतला?

या प्रश्नावर उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, याबाबत नेमकेपणाने थेट बोलायचं झालं तर दादांचं जाणं दुःखदायक आहे, त्यामध्ये कोणताही दुमत असायचं कारण नाही, मात्र भाजप सोबत अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, भाजपासोबत जे जे आहेत त्या विचारधारेसोबत आम्ही विरोधात राहणारच कोणत्याही परिस्थितीत ही आमची भूमिका आहे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या खर्गे साहेबांना भेटायला गेल्या, त्यांनी भेटून माघार घेण्याची विनंती केली, त्यावेळी खर्गे साहेबांनी त्यांना सांगितलं, हा प्रदेश काँग्रेसचा निर्णय आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीशी बोला. त्यांनी ठरवलं तर माघार होईल. नाहीतर आम्ही निवडणूक पुढे लढू, आणि आजच्या संदर्भामध्ये आम्ही प्रदेश काँग्रेस या नात्यांना पुढे जात असताना महाविकास आघाडी म्हणून कसं पुढे जावं हा असणारा घटनाक्रम आहे. मुख्यमंत्र्यांचाही फोन आला बरोबर होता, मुख्यमंत्र्यांचा फोन जो आला त्याचा आणि निर्णय प्रक्रियेचा कुठलाही संबंध नव्हता, पण त्यांनी एक महाराष्ट्राची संस्कृती असा शब्द जेव्हा वापरला, तेव्हा मला तो भावला त्या संस्कृतीचा रक्षण करण्याच्या अनुषंगाने आपण साथ दिली पाहिजे अशी एक भूमिका पण आहे, आता संस्कृती आणि विकृती या ज्या दोन गोष्टी आहेत, विकृती खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात वाढते आहे, त्या विकृतीकडे त्यांचं लक्ष जावं हीच या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो, असंही सपकाळांनी म्हटलं आहे.

Congress: काँग्रेसची मविआसमोर नेमकी कोणती अट?

दरम्यान, काँग्रेसने अंबादास दानवे यांना कोणत्या मुद्यावर पाठिंबा दिला? याबाबतची माहिती देखील समोर आली आहे. आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. तर विधान परिषदेची एक जागा ठाकरे गटाला देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची अट मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.